Headlines

सगुण-निर्गुण : गोवत्स न्याय… – maharashtra times sagun nirgun today article


अवघ्या भूतमात्रांबद्दलचं प्रेम येतं. आपपर भाव लोप पावतो. साऱ्या चराचरात जे चैतन्य आहे, जी शक्ती आहे, तीच माझ्यातही आहे याची जाणीव त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून दिसत राहते.

सगुण-निर्गुण गोवत्स न्याय
Sagun Nirgun(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
अनिरुद्ध शांडिल्य

सर्वसाधारण अनुभव असा आहे की, प्रवचन करताना मोठाल्या गोष्टी करणारे, तत्त्वाच्या कथा सांगणारे, मोहमायापाश विषवत असल्याचं प्रतिपादन करणारे, सोने रूपे आम्हा मृत्तिकेसमान असं बोलणारे प्रत्यक्ष आयुष्यात याच्या विपरीत वागत असतात. त्यांना प्रसिद्धी, पैसा यांची हाव असते. कनक-कांता यांची ओढ असते. योगाकडं नाही, तर भोगाकडं त्यांचं मन झेपावत असतं. जुनी उपमा द्यावयाची, तर नाटकामध्ये धैर्यधराचं काम करणारा प्रत्यक्षात घाबरट असावा किंवा लक्ष्मीधराची भूमिका वठवणारा वास्तवात गरिबीनं गांजलेला असावा, तशी यांची गत असते. समोरचा भुलेल असं बोलण्यात ते वाकबगार असतात. चेहऱ्यावरील भावदर्शनात निष्णात असतात. थोडक्यात, ते उत्तम अभिनेते असतात. या आकर्षक; पण फसव्या मुखवट्यामागचं त्यांचं रूप भलतंच असतं. अनेकदा तर ते आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं असू शकतं. याचं एक कारण भक्ती करण्यामागं, देवाचं नामस्मरण करण्यामागं, प्रवचन करण्यामागं त्यांचा हेतू हा निखळ भक्तीचा नसतो. उद्देश हा देवाच्या चरणी लीन होण्याचा नसतो. त्याच्या चिंतनातच आनंद मानण्याचा नसतो. त्याच्या ध्यानातच सुख आहे, अशी त्यांची धारणा नसते.

म्हणजेच ती भक्ती खरी नसते, तर आपला मनातला हेतू साध्य करण्यासाठी उभा केलेला तो देखावा असतो. आणि जसा उद्देश तसा परिणाम हे वारंवार सिद्ध झालं आहे. त्यामुळेच ‘अशा’ भक्तामध्ये कोणत्याही प्रकारच्या विरक्तीची कुठलीही लक्षणं दिसत नाहीत. उलट कनक, कांता, कीर्ती याबद्दल विलक्षण आसक्ती त्यांच्या मनात असते. ती त्याच्या देहबोलीतून अनेकदा व्यक्त होते. त्याच्या कार्यक्रमांच्या स्वरूपावरून स्पष्ट होते. हे खऱ्या भक्ताच्या बाबतीत कधीही दिसत नाही. खऱ्या भक्तामध्ये ‘गोवत्स न्याया’प्रमाणं भक्तीच्या मागोमाग विरक्ती येतेच. विशाल दृष्टी येते. अवघ्या भूतमात्रांबद्दलचं प्रेम येतं. आपपर भाव लोप पावतो. साऱ्या चराचरात जे चैतन्य आहे, जी शक्ती आहे, तीच माझ्यातही आहे याची जाणीव त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून दिसत राहते. तुकाराम महाराज सांगतात, ‘भक्त ऐसे जाणा जे देही उदास। गेले आशापाश निवारूनि।। विषय तो त्यांचा जाला नारायणा। नावडे जन धन माता पिता।। निर्वाणी गोविंद असे मागें पुढें। कांहींच साकडें पडों नेदी।। तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साह्य। घातलिया भय नर्का जाणें।।’

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा