Sachin Tendulkar : देशभरात शिक्षण सुधारणांसाठी जंतर-मंतरवर विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अखेर मौन सोडले आहे. आपल्या दिवंगत वडिलांची आठवण करून देताना सचिनने एक सविस्तर पोस्ट केली आहे. नेमकं काय म्हणाला जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच २० जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतरला पोहोचण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आरोप आहे की अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून त्यांना रोखले. जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचाही वापर करण्यात आला.या संपूर्ण प्रकरणावर क्रिकेट विश्व गप्प का, असा प्रश्न विचारला जात होता. अशातच ‘भारतरत्न’ क्रिकेटचा सचिन तेंडुलकर याने पोस्ट केली आहे.
सचिन तेंडुलकर काय म्हणाला?
माझे वडील प्राध्यापक होते. ते अनेक तरुणांसाठी मार्गदर्शक आणि गुरु होते. त्यांनी लहानपणापासून मला एकच गोष्ट शिकवली – अपयश चालेल, पण फसवणूक नाही. आयुष्यात कधीही शॉर्टकट घेऊ नका. समाजातील प्रौढ म्हणून संस्कृतीला योग्य दिशा देण्याची जबाबदारी आपली आहे. जो समाज प्रयत्नांपेक्षा निकालांना जास्त महत्त्व देतो, तो समाज गुणवत्तेऐवजी शॉर्टकटचा मार्ग निवडतो. अशी शॉर्टकटची संस्कृती देशाच्या भविष्याला कमकुवत करते. आज जेव्हा विद्यार्थी निराश आहेत कारण त्यांच्या मेहनतीला योग्य फळ मिळाले नाही, तेव्हा त्यांची ही भावना समजून घेण्यासारखी आहे, असं सचिन तेंडुलकर म्हणाला. IND vs ZIM 1st T20 : मन मोठं लागतं! कॅप्टन झाल्यावर मिळालेल्या पहिल्या विजयाचे दोघेच शिलेदार, श्रेयस अय्यरने जाहीरपणे घेतली नावे, पाहा कोण? आपण सर्वांनी मिळून असे प्रयत्न केले पाहिजेत की पुन्हा कोणत्याही विद्यार्थ्याला असे वाटू नये. युवा भारत स्वप्नांनी आणि उर्जेने भरलेला आहे. ते आपल्या देशाच्या यशाचा पाया आहेत. शेवटी त्यांनी सर्वांना आवाहन केले की पालक, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शाळा आणि प्रशासन अशा सर्वांची ही सामायिक जबाबदारी आहे की आपल्या तरुणांना प्रोत्साहन आणि ऊर्जा दिली पाहिजे. आपण अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे जिथे मेहनतीचा सन्मान होईल, प्रामाणिकपणाला प्रोत्साहन मिळेल आणि गुणवत्तेलाच यश मिळेल. मला विश्वास आहे की आपण सर्व मिळून असे उपाय शोधू ज्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित होईल, असंही सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. शेवटला सचिनने “जय हिंद” म्हटलं आहे. IND vs ZIM 1st T20 : वर्ल्ड कपनंतर भारताचा पहिलाच विजय, झिम्बाब्वे 7 विकेटने पराभूत; श्रेयसने खातं उघडलं, मॅन ऑफ द मॅच कोण? दरम्यान, आतापर्यंत युवराज सिंग, शिखर धवन आणि भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यांनीही या आंदोलनावरून पोस्ट केल्या आहेत. आता सचिन तेंडुलकरनेही पोस्ट केल्याने इतर आजी-माजी खेळाडू पुढे सरसवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा