![]()
तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरुडा गावात एका ३५ वर्षीय युवकाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. मनीष प्रकाशराव पाथरे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीष पाथरे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. सायंकाळ होऊनही ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शेतात जाऊन पाहिले. त्यावेळी ते एका कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मनीष पाथरे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तिवसा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
वरुडा येथे 35 वर्षीय युवकाची शेतात आत्महत्या:कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले, कारण अस्पष्ट
