लेकाला घेऊन CJP च्या आंदोलनात सहभाग, महिला थेट भिडली, व्हायरल व्हिडिओची सेना-मनसेकडून दखल – woman confronts police over democracy at cjp protest goes viral
लेकाला घेऊन CJP च्या आंदोलनात सहभाग, महिला थेट भिडली, व्हायरल व्हिडिओची सेना-मनसेकडून दखल – woman confronts police over democracy at cjp protest goes viral
कोक्रोच जनता पार्टीच्या चलो संसद या आंदोलनाला देशभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. मुंबईतही CJP च्या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळाले. दादर येथील चैत्यभूमी परिसरात विद्यार्थी आंदोलनासाठी पोहोचले. CJP समर्थनार्थ झालेल्या या आंदोलनादरम्यान एक महिला देखील आपल्या लहान मुलासह सहभागी झाली होती. पोलिसांनी उभं राहण्यास रोखलं असता महिलेचा संताप अनावर झाला आणि महिलेने पोलिसांसह सरकार आणि संपूर्ण प्रशासनालाच खडेबोल सुनावलेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून महिलेने ठामपणे मांडलेल्या या भूमिकेची दखल घेण्यात येतेय. खासदार संजय राऊत यांनीही महिलेच्या धाडसाचं कौतुक केलंय.