Headlines

रेल्वे स्थानकावर नवा एलिव्हेटेड डेक आणि पूल सेवेत, एक्सप्रेस-लोकलचे दररोज हजारो प्रवासी; वसई-डहाणू मार्गावर फायदा| Maharashtra Times


Western Railway: पश्चिम रेल्वेच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी नवीन पादचारी पूल आणि एलिव्हेटेड डेक सुरू झाला आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत हे काम पूर्ण झाले. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

vasai railway station bridge
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, वसई: वसई रोड स्थानक येथे नव्याने पादचारी पूल आणि एलिव्हेटेड डेक प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आला आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पा अंतर्गत हे काम पूर्ण करण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, येथे लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा आहे. त्यामुळे या स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. फलाट क्रमांक 4 व 5 वरून सुटणाऱ्या मेमू गाड्या, तसेच फलाट क्रमांक 6 व 7 वरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे या परिसरात मोठी गर्दी होत होती.

Maharashtra TimesKonkan Railways: शिमग्याला कोकणात जाताय? होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या; मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी-कुठे?

या गर्दीवर उपाय म्हणून येथे नव्याने पादचारी पूल आणि एलिव्हेटेड डेक उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. अखेर हे काम पूर्ण झाले असून, हा पूल नुकताच प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळमार्फत उभारण्यात आलेला पादचारी पूल 42 मीटर लांब व 6 मीटर रुंद असून एलिव्हेटेड डेक 50 मीटर लांबीचा आहे. या सुविधेमुळे पादचारी पुलांवरील गर्दी नियंत्रणात येण्यास मदत होणार असून पूर्वेकडून येणाऱ्या प्रवाशांना थेट फलाटावर जाणे सुलभ होणार आहे.

पढे कसा होणार विस्तार?

वसई रोड स्थानकावर कोचिंग टर्मिनस उभारण्याची योजना देखील आहे. सध्याच्या वसई रोड रेल्वे स्थानका शेजारी हे बांधण्यात येणार आहे. लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या आणि उपनगरिय रेल्वे साठी हे एक महत्त्वाचं स्थानक बनणार आहे. शिवाय पनवेल-वसई कॉरिडोरचं सध्या काम सुरु आहे. हे काम 2027पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. याअंतर्गत तब्बल 5 किमी लांब नवे रूळ, प्लॅटफॉर्म आणि लांब पल्ल्यांच्या ट्रेनसाठी विशेष सुविधा सुरु होणार आहेत.

Maharashtra TimesMumbai Water Metro: डिसेंबरपासून मुंबईत धावणार ‘जल मेट्रो’, मंत्री नितेश राणेंचा गेमचेंजर प्लॅन; नरिमन पॉइंट, वर्सोवा… कसे असतील 8 मार्ग?

वाहतूक कोंडीतून सुटका कधी?

वसई पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या अंबाडी उड्डाणपुलावर आणि पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांवर सकाळी व सायंकाळच्या वेळेत मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जुना अंबाडी पूल तोडण्यात आल्याने तो पूर्णतः बंद आहे. त्याजागी रेल्वेतर्फे नव्या पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व वाहतुकीचा भार नव्या पुलावर येत असून तीनही बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे येथे मोठी कोंडी होत आहे. तसेच पुलाला जोडणारे पश्चिमेकडील अंबाडी रस्ता आणि पूर्वेकडील जोड रस्तेही कोंडीत अडकलेले असतात. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा