Headlines

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान:दळवटमध्ये शेतकऱ्यांना शेती साहित्य वाटप; 100 टक्के अनुदानावर तूर बियाणे, 150 खतांच्या गोण्यांचे वितरण‎




दळवट येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला आणि कडधान्य उत्पादनाला गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य योजनेतंर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात परिसरातील निवडक शेतकऱ्यांना नाममात्र दरात अथवा १०० टक्के अनुदानावर तूर बियाणे मिनी किट आणि खतांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन व साहित्याचे वाटप आमदार नितीन पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कल्याणकारी योजनेचा लाभ परिसरातील एकूण ५० गरजू शेतकऱ्यांना मिळाला असून, त्यांना उच्च प्रतीचे तूर बियाणे मिनी किट देण्यात आले. तसेच पिकांच्या उत्तम वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी २५० खतांच्या गोण्यांचेही वाटप यावेळी करण्यात आले. यामुळे चालू खरिपात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपले उत्पन्न वाढवावे. असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी यावेळी बोलताना केले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये तालुका कृषी अधिकारी वाल्मिक प्रकाश, सहाय्यक कृषी अधिकारी आर. यू. रंधे, मंडळ कृषी अधिकारी आर. के. सावंत, तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी प्रणय हिरे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना खरिपातील पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. या योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल दळवट परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत