बॉक्स ऑफिसवर मोठ्या सिनेमांचा क्लॅश आणि स्पर्धा पाहायला मिळत असली, तरी यावेळी थेट हॉलिवूड विरुद्ध भारतीय चित्रपट अशी चुरस रंगली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या काळात प्रदर्शित झालेल्या अवघ्या ४ हॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवत बॉलिवूड आणि दाक्षिणात्य (साऊथ) चित्रपटांच्या कमाईला चांगलाच ब्रेक लावला आहे.
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, केल्या काही महिन्यात चार हॉलिवूड चित्रपटांनी भारतात एकूण ३५१.७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त नेट कलेक्शन केलं आहे.
१. ‘मायकल’नं ‘भूत बंगला’ अन् ‘राजा शिवाजी’ची रोखली कमाई
हॉलिवूडचा प्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या आयुष्यावर आधारित ‘मायकल‘ ( Michael ) हा चित्रपट २४ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या आगमनामुळं आधीच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असलेल्या ‘भूत बंगला’ (१८२ कोटी) आणि ‘राजा शिवाजी’ (९६.३९ कोटी) या चित्रपटांच्या कमाईचा वेग मंदावला होता. या सिनेमानं भारतात ७१ कोटींच्या जवळपास कमाई केली तर या सिनेमाचं वर्ल्डवाइड कलेक्शन हे $1.001 Billion म्हणजेच ८ हजार कोटींच्यावर होतं.
२. ‘ ऑब्सेशन ‘ची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड
हॉलिवूडचा हॉरर-ड्रामा ‘ऑब्सेशन’ २९ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळं जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झालेले ‘बंदर’ (४.२० कोटी), ‘मैं वापस आऊंगा’ (६५ कोटी), ‘सिंग गीतम’ (५.३३ कोटी) आणि ‘गव्हर्नर’ (५.८७ कोटी) हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. ‘ऑब्सेशन’ हा या काळातील सगळ्यात फायदेशीर चित्रपट ठरला. या सिनेमाची भारतातील कमाई ही ८४ कोटींच्या घरात होती. तर सिनेमानं जगभरात तब्बल तीन हजार कोटींच्यावर गल्ला जमवला होता.
Priyanka Chatuvedi: आता समजलं की ‘रामायणम्’चा प्रोमो इतका वेळ लपवून का ठेवला, प्रियंका चतुर्वेदींची ट्रेलरवर प्रतिक्रिया चर्चेत
३. ‘द ओडिसी’चा ‘धमाल ४’ आणि ‘लेनिन’वर परिणाम
मोठ्या बजेटचा ‘द ओडिसी’ चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. या चित्रपटामुळे हिंदीतील बहुप्रतिक्षित ‘धमाल ४’ (१५५.८५ कोटी) आणि दाक्षिणात्य चित्रपट ‘लेनिन’ (४८.८४ कोटी) यांच्या कमाईवर थेट परिणाम झाला. या सिनेमानं भारतात आतापर्यंत १३५ कोटींची कमाई केली असून जगभरातील कमाईचा आकजा हा ७,१०० कोटींपर्यंत पोहोचलाय.
४. ‘स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे’चा धमाकेदार ओपनिंग
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ चित्रपटानं पहिल्याच दिवशी ६०.६० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन करत बॉक्स ऑफिसवर पकड निर्माण केलीय. या चित्रपटाच्या वादळामुळं ‘जन नायकम’ (१५३.५५ कोटी) आणि ‘भाई तेरा स्टार है’ सारख्या चित्रपटांची कमाई थंडावली आहे. या सिनेमानं आतापर्यंत ६० कोटींच्यावर कमाई केली आहे.
मराठी सिनेमांना मोठा फकटा
हॉलिवूड सिनेमांचा सगळ्यात मोठा फटका हा प्रादेशिक सिनेमांना बसताना दिसतो.गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांच्या कमाईवर हॉलिवूड सिनेमांमुळं मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं. सध्या ‘स्पायडर मॅन’ मुळे मराठी सिनेमांना शो कमी मिळत असल्याचा वाद सुरू आहे.
कोरोनानंतरच्या काळात भारतीय प्रेक्षकांची पसंती बदलली असून, ते केवळ स्टार कास्टवर न जाता कंटेंटला प्राधान्य देत आहेत. त्यामुळंच बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे मोठे स्टार्स असतानाही, हॉलिवूडच्या मजबूत कथानक आणि व्हिज्युअल इफेक्ट्स असणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षक पसंती देत आहेत.

