Vasai Creek Bridge: सध्या भाईंदरवरून वसईला जाण्यासाठी 39 किमी प्रवास करावा लागतो. हेच अंतर या नव्या पुलामुळे 5 किमी वर येऊ शकतं. पण अनेक कारणांमुळे गेली 13 वर्ष हा पूल रखडला होता. आता MMRDA ने एका बैठकीत नवा प्रस्ताव सादर केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वसई: मिरा रोड ते विरार मेट्रो लाइन 13च्या मार्गावर एक डबल डेकर पूल उभारण्याची योजना आखली जात आहे. भाईंदर आणि वसई शहराला जोडणाऱ्या या पुलामुळे 90 मिनिटांचा प्रवास केवळ 10 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. आता एमएमआरडीएने यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली असून राज्य सरकारकडे गेल्या आठवड्यात एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे.
कसा असेल पूल?
2000 मध्ये पहिल्यांदा वसई ते भाईंदर पुलाची योजना मांडण्यात आली होती. त्यानंतर 2023मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. आता 13 वर्ष उलटून गेले असूनही या प्रकल्पाच्या कामाला काही सुरूवात झालेली नाही. या योजनेनुसार वसईच्या खाडीवर, मेट्रो मार्गिकेवर डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. सर्वात खाली रस्ता, त्यावरती मेट्रो लाइन 13चा मार्ग आणि सर्वात वरच्या स्तरावर पूल बांधण्यात येणार आहे.
सध्या भाईंदर ते वसई प्रवासात 39 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं. हा पूल तयार झाला तर हे अंतर अवघ्या 5 किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवरून थेट 10 मिनिटे होण्याची शक्यता आहे. यामुळे वसई-विरारमधील लाखो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या पुलासाठी एकूण अंदाजित खर्च 2,500 कोटी रुपये असेल. सध्या वापरल्या जाणाऱ्या 39 किमी लांब मार्गासाठी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
विलंबाचे कारण काय?
वसई-विरारचे माजी महापौर नारायण मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी 5 वेग वेगळ्या सरकारी यंत्रणांकडून मंजुरी मिळणं आवश्यक आहे. यापैकी महाराष्ट्र सागरी मंडळ, भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. पंरतु, या प्रकल्पासाठी खारफुटीची जमीन आणि मिठागरांची जमीनही संपादित करावी लागणार आहे. त्यामुळे वन विभाग आणि केंद्र सरकारच्या मीठ आयुक्तांकडून मंजुरी शिल्लक आहे. गेल्या आठवड्यात याबद्दल बैठक पार पडली असून पालघरचे जिल्हा अधिकारी, MMRDAचे आयुक्त, महसूल सचिव आणि कोकण विभागीय आयुक्तांचा समावेश होता.
वसई-भाईंदर पुलासाठी मिठागरांची जमीन संपादित करण्यापूर्वी या जमिनीवर राहणाऱ्या मीठ उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. 2013मध्ये या जमिनीवर राहणार्या 10 परिवारांनी जमिन त्यांच्या मालकीची असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण त्या जमिनींच्या नुकसान भरपाईचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे.
प्रस्तावित पूल मुंबई-वसईपासून थेट गुजरातपर्यंत एक दुवा म्हणून काम करेल. सध्या वसई आणि भाईंदरदरम्यान कोणताही थेट मार्ग नाही. प्रवाशांना केवळ रेल्वे मार्गे प्रवास करावा लागतो. रस्ते मार्गे प्रवास करताना NH-48चा वापर करावा लागतो. हा मार्ग इतकी रहदारी हाताळू शकत नाही त्यामुळे मार्गावर सतत वाहतूक कोंडी होते. हा प्रस्तावित पूल रेल्वे ट्रॅकच्या पश्चिमेकडून बांधला जाणार आहे.मुर्धा गाव येथील नेताजी सुभाषचंद्र मैदानाजवळील उत्तन रोडपासून हा पूल सुरू होईल. पुढे भाईंदरमधील मिठागराच्या जमिनीवरून पंजू बेटाला जोडून वसईच्या खाडीवरून पुढे नायगाव येथे खाली उतरेल. नायगावच्या कुटिन्हो रोडवर हा पूल संपणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा