Kaun Banega Crorepati 18:हिंदी टीव्ही विश्वातला लोकप्रिय असा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचं हे १८ वं पर्व आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ‘ कौन बनेगा करोडपती ‘ (KBC) हा शो आपल्या १८ व्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आपल्या दमदार आवाजात “देवी आणि सज्जनांनो…” म्हणत हॉटसीटवर बसणाऱ्या स्पर्धकांसह प्रेक्षकांचे स्वागत करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये हॉटसीटवर बसलेल्या डॉ. जागृती अग्रवाल यांनी आपल्या उत्कृष्ट ज्ञानाच्या जोरावर ५० लाख रुपयांच्या १४ व्या प्रश्नापर्यंत धडक मारली. मात्र, महिला दिनाशी संबंधित एका कठीण प्रश्नावर त्यांनी कोणताही धोका न पत्करता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
काय होता ५० लाख रुपयांचा प्रश्न?
हॉटसीटवर अमिताभ बच्चन यांनी डॉ. जागृती यांच्यासमोर ५० लाख रुपयांसाठी १४ वा प्रश्न मांडला. १९१० मध्ये कोपनहेगन इथं आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वर्किंग वुमन’ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्याची संकल्पना कोणी मांडली होती? असा हा प्रश्न होता. या प्रश्नाला चार पर्याय देण्यात आले होते. पर्याय होते, A) जेन ॲडम्स (Jane Addams)B) एमेलीन पॅंकहर्स्ट (Emmeline Pankhurst)C) रोझा लक्झमबर्ग (Rosa Luxemburg)D) क्लारा जेटकिन (Clara Zetkin) .
डॉ. जागृती यांनी या टप्प्यापर्यंत आपल्या सर्व लाईफलाईन्स वापरून झाल्या होत्या. चुकीचं उत्तर दिल्यास जिंकलेली रक्कम थेट ५ लाख रुपयांवर खाली आली असती. डॉ. जागृती यांच्या मनात ‘D) क्लारा जेटकिन’ या उत्तराबाबत शक्यता होती, पण पूर्ण खात्री नसल्यामुळं त्यांनी २५ लाख रुपये घेऊन खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा