अहिल्यानगर येथे विधान परिषदेवर नियुक्त झालेल्या भाजप आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, प्राजक्त तनपुरे आणि विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले अक्षय कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित होते. एकाच पक्षातील मात्र याआधी एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले नेते एकाच मंचावर आल्याने या कार्यक्रमाची चर्चा होती. या कार्यक्रमातून प्राजक्त तनपुरे हे प्रकृती अस्वस्थ असल्याने सत्कार स्वीकारल्यानंतर लगेच कार्यक्रमातून बाहेर पडले. यावरून राम शिंदे यांनी मिश्कील टीप्पणी केली. तनपुरे अजूनही भाजपमध्ये थोडे अवघडलेले दिसतात. कारण त्यांचे मामा अजून दुसऱ्या पक्षात म्हणजे शरद पवार राष्ट्रवादीत आहेत, असे म्हणत त्यांनी वातावरण हलके केले. राम शिंदे यांच्या या वक्तव्यावर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी लगेचच टोला लगावला. त्यांच्या मामांनाही आपल्याकडे घ्या, असे म्हणताच हशा पिकला. दरम्यान ही जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटलांकडे असल्याचं सांगत राम शिंदेंनी त्यांच्या गोटात चेंडू भिरकावला. या कार्यक्रमात नेमकं काय घडलं ते पाहा…