![]()
त्रिनिदाद आणि टोबॅगोची राजधानी पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 344 धावांवर गुंडाळल्यानंतर पाकिस्तानने 387 धावा करून 43 धावांची आघाडी घेतली. याला प्रत्युत्तर म्हणून यजमान संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत आपल्या दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 103 धावा केल्या. त्यांची आघाडी आता फक्त 60 धावांची राहिली आहे. अशा परिस्थितीत चौथ्या दिवशी पाकिस्तानला छोटो आव्हान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघ विजयाच्या मजबूत स्थितीत दिसत आहे. फिरकीपटूंनी बदलले सामन्याचे चित्र तिसऱ्या दिवसाचे शेवटचे सत्र सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरले. सुरुवातीला वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी पाकिस्तानची आघाडी संपुष्टात आणली होती, परंतु त्यानंतर फिरकीपटू साजिद खान आणि अली उस्मान यांनी सलग बळी घेऊन सामन्याचे चित्र पाकिस्तानच्या बाजूने फिरवले. साजिद खानने तेजनारायण चंद्रपॉलला LBW बाद करून पहिले यश मिळवले. त्यानंतर त्याने शाई होप आणि नाइटवॉचमन जेडन सील्सलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर अली उस्मानने दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर रोस्टन चेजचा स्वतःच्याच चेंडूवर झेल घेऊन वेस्ट इंडिजला सहावा धक्का दिला. आता वेस्ट इंडिजचे फक्त चार विकेट बाकी आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानसमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवणे त्यांना सोपे नसेल. शफीकच्या १५० धावांनी पाकिस्तानला आघाडी मिळाली यापूर्वी पाकिस्तानचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला. सलामीवीर अब्दुल्ला शफीकने शानदार १५० धावा केल्या आणि संघाला पहिल्या डावात ४३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मात्र, तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पाकिस्तानने झटपट विकेट गमावल्या. बाबर आझम 88 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर पदार्पण करणारा अझान जफर खाते न उघडताच बाद झाला, तर सलमान आगाही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. पाकिस्तानने 5 धावांच्या आत 3 महत्त्वाच्या विकेट गमावल्या. त्यानंतर मोहम्मद रिझवान (22 धावा) आणि साजिद खान (20 धावा) यांनी उपयुक्त खेळी करत संघाची आघाडी 43 धावांपर्यंत वाढवली. वॉरिकनने घेतल्या 6 विकेट वेस्ट इंडिजकडून डावखुरा फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 42 धावा देऊन 6 बळी घेतले. वॉरिकनने उबैद शाह आणि मोहम्मद अलीला सलग चेंडूंवर बाद केले, मात्र, त्याची हॅट्ट्रिक हुकली. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळेच वेस्ट इंडिजने पाकिस्तानला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यापासून रोखले.
Source link
पाकिस्तान विजयाच्या जवळ:वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 6 विकेट पडल्या, फक्त 60 धावांची आघाडी; सर्व विकेट साजिद-उस्मानच्या नावे
