Headlines

पळसंबच्या विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्टने जपली सामाजिक बांधिलकी!


मसुरे प्रतिनिधी : पळसंब येथील विठठल रखुमाई देवालय ट्रस्टने आषाढी एकादशीच्या दिवशी जुने परंतु वापरण्यास योग्य कपड्याचे संकलन करणे हा सेवाभावी उपक्रम राबविला होता. गुरु पौर्णिमेचे औचित्य साधत देवालय ट्रस्टच्या वतीने सविता आश्रम पणदूर येथे भेट देत संस्था चालक श्री. संदिप परब यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व कपडे पोच करत सामाजिक बांधिलकी जपली . त्यावेळी श्री.संदिप परब यांनी रस्ता वरील वंचित निराधार वयोवृद्ध मानसिक रुग्ण यांना आश्रमाच्या माध्येमातून सकस अन्न – वस्त्र निवारा व उपचार सुविधा मिळवून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असून जमेल त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. देवालय ट्रस्ट च्या उपक्रमांचे कौतुक केले.
त्यावेळी पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, देवालय ट्रस्ट अध्यक्ष श्री . मेघश्याम गोलतकर, सचिव श्री. मधुकर कदम, श्री. सत्यवान परब, श्रीं पुरुषोत्तम साईल, मंगेश घाडी, उपसरपंच श्री.अविराज परब, पळसंब पोलीस पाटील सौ. अनुष्का परब,उल्हास सावंत, प्रथमेश परब, भुवन परब उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत