Headlines

तो तर माझा नोकर …’लाफ्टर शेफ्स’ फेम समर्थ जुरैल आणि अभिषेक कुमारचा वाद चव्हाट्यावर, सोशल मीडियावर चर्चेला उधाण


Abhishek Kumar slams Samarth Jurel:बिग बॉस सीझन १७ आणि ‘लाफ्टर शेफ्स’ चे स्पर्धक अभिनेता अभिषेक कुमार आणि समर्थ जुरैल या दोघांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

Abhishek Kumar slams Samarth Jurel:
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
‘ लाफ्टर शेफ्स ‘च्या तिसऱ्या सीझनची चांगलीच चर्चा झाली. या सीझनमध्ये अभिनेता अभिषेक कुमार आणि समर्थ जुरैल यांची जोडीही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. पण आता हा सीझन संपत आला असतानाच या दोघांमध्ये बिनसल्याच्या चर्चा सुरू आहे. दोघांनीही उघडपणे एकमेकांची खिल्ली उडवली आहे.

अभिषेक कुमार आणि समर्थ जुरैल (यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये समर्थनं अभिषेकचा उल्लेख ‘माझा नोकर’ असा केला होता. समर्थच्या या वादग्रस्त वक्तव्यावर आता अभिषेक कुमारनं मौन सोडलं असून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नक्की काय घडलं होतं?

तर काही दिवसांपूर्वी समर्थ जुरैलनं युट्युबवर दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या ‘लाफ्टर शेफ्स’ मधील कुकिंग स्किल्सवर भाष्य केलं होतं. यावेळी बोलताना समर्थ म्हणाला होता, “मी खूप छान स्वयंपाक करतो, पण तो (अभिषेक) सर्व काही बिघडून टाकतो… तो तर माझा नोकर आहे.” एवढंच नाही तर अभिषेक हा शोमधील इतर कलाकार जसं की कृष्णा अभिषेक आणि विकी जैन यांच्यासाठी ‘हेल्पर’ (मदतनीस) आणि ‘ड्रायव्हर’सारखं काम करतो, अशीही खिल्ली समर्थने उडवली होती.

अभिषेक कुमारचे सडेतोड उत्तर

समर्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिषेकनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहीत समर्थला खडेबोल सुनावले आहेत. अभिषेकनं लिहिलं की, “जेव्हा आपण कॅमेऱ्यासमोर किंवा शोमध्ये एकमेकांची खिल्ली उडवतो, तेव्हा त्यामागं केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा चांगला हेतू असतो. तो एक शोचा भाग असतो आणि आम्हीही ते समजून घेतो. पण दुसऱ्या कोणाच्या युट्युब चॅनलवर जाऊन माझ्याबद्दल अशा पद्धतीचे घाणेरडे शब्द वापरणे अत्यंत अपमानास्पद आहे. अशा गोष्टी फक्त शोमध्येच चांगल्या वाटतात, खऱ्या आयुष्यातील मुलाखतींमध्ये नाही.

Maharashtra TimesGargi Phule: ‘चार-पाच सिनेमे केले, पण त्यानं बाबांना एक रुपया देखील दिला नाही’, गार्गी फुलेंनी दाखवलं इंडस्ट्रीतलं वास्तव, मानधनाच्या मुद्द्यावर केलं भाष्य
“माझ्या कुटुंबाला मनस्ताप झाला…”
आपल्या भावना व्यक्त करताना अभिषेक पुढं म्हणाला की, मी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला, तेव्हा सुरुवातीला सार्वजनिकरी्या काहीही न बोलणं पसंत केलं. पण जेव्हा हे वक्तव्य माझ्या कुटुंबीयांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचलं, तेव्हा त्यांना याचा खूप मोठा धक्का बसला आणि त्यांचं मन दुखावलं गेलं आहे. कोणत्याही पालकांना आपल्या मुलाचा असा सार्वजनिक अपमान झालेला सहन होणार नाही.

मी नेहमीच समर्थला एक चांगला माणूस समजून त्याचा आदर केला, म्हणूनच त्याच्या या शब्दांमुळं मला जास्त त्रास झाला आहे.

Maharashtra TimesAbhijeet khandkekar: ‘टीव्हीत काम करणं रोजंदारी नोकरी केल्यासारखं आहे’, मराठी मालिकासृष्टीचा स्टार अभिजीत खांडकेकरचं वक्तव्य चर्चेत
‘बिग बॉस’पासून सुरू असलेला वाद
अभिषेक कुमार आणि समर्थ जुरैल यांचा वाद नवीन नाही. ‘बिग बॉस १७‘ च्या घरातही या दोघांमध्ये प्रचंड भांडण झालं होतं, जिथं अभिषेकनं समर्थच्या कानाखालीही लगावली होती. शो संपल्यानंतर आणि ‘लाफ्टर शेफ्स’ मध्ये एकत्र काम करताना त्यांच्यात मैत्री झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, समर्थच्या या नव्या विधानामुळं या दोघांमधील मैत्रीत आता पुन्हा एकदा मोठी दरी निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावरही चाहते यावरून समर्थ जुरैलला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत असून अभिषेकला पाठिंबा देत आहेत.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा