Headlines

तीर्थक्षेत्र कपिलधारा येथे ११६ कोटींची कामे सुरू; विकासासाठी कटिबध्द


म.टा .प्रतिनिधी ,नाशिक/घोटी : सिंहस्थ कुंभमेळ्याशी ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या निगडित असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधारा-कावनई व परिसरात ११६ कोटींची विकासकामे सुरू आहेत. या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि भाविकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. कावनई (ता. इगतपुरी) येथे रविवारी आगामी सिंहस्थ महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर आयोजित गंगा-गोदावरी पूजन, भूमिपूजन व वृक्षारोपण सोहळ्यात ते बोलत होते.

साधू- महंतांची उपस्थिती

यावेळी विविध साधू-महंत, आमदार हिरामण खोसकर, शांताराम मोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांसह मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘अतिथी देवो भव’ या भावनेतून भाविकांना सुविधा

मंत्री भुजबळ म्हणाले की, कुंभमेळ्यात देश-विदेशातून लाखो भाविक येणार असल्याने रस्ते, वाहतूक, पार्किंग, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या मूलभूत सुविधा सक्षम करण्यात येत आहेत. जलस्रोत स्वच्छ ठेवून ‘अतिथी देवो भव’ या भावनेतून भाविकांना सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच, विकासकामे पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Maharashtra TimesMalshej Ghat : पावसाचं रौद्ररुप, घाटात रस्ता खचला, माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद

विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता

आमदार हिरामण खोसकर यावेळी म्हणाले, ग्रामपंचायत, तीर्थक्षेत्र विकास समिती आणि प्रशासन यांच्या समन्वयातून तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन ‘अतिथी देवो भव’या भावनेतून भाविकांना सुविधा त्यांनी केले.

श्रीक्षेत्र कपिलधारा हे प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे

महंत रामनारायण दास फलाहारी महाराज म्हणाले, कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत. वैष्णव अखाड्यांच्या प्रतिनिधींनी कपिलधारा येथे पारंपरिक स्नानाची निश्चित तारीख अधिकृतपणे जाहीर करून सिंहस्थ प्राधिकरणाच्या नियोजनात या तीर्थक्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली. जगतगुरू आदिनाथ संप्रदाय पिठाधीश्वर कल्कीराम महाराज म्हणाले, श्रीक्षेत्र कपिलधारा हे प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे.

त्याच्या धार्मिक वारशाचे जतन करण्याबरोबरच भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी शासनाचा विविध विकास निधी आणून सर्वांगीण विकास हा सर्व लोकप्रतिनिधी शासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल.

Maharashtra TimesAccident News: सख्या भावांच्या बाईकला बारामतीत भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू; काळाजाचा ठोका चुकवणारा अपघात कॅमेऱ्यात कैद!

पारंपारिक स्नानाची तारीख जाहीर करा

कार्यक्रमप्रसंगी वैष्णव अखाड्यांच्या प्रतिनिधींनी कपिलधारा येथील पारंपरिक स्नानाची निश्चित तारीख १७ ऑगस्ट २०२७ ही अधिकृतपणे जाहीर करावी आणि सिंहस्थ प्राधिकरणाच्या मुख्य नियोजनात या क्षेत्राचा समावेश करावा, अशी महत्त्वाची मागणी शासनाकडे केली.

. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक व त्र्यंबकेश्वर भागात व्यापक पायाभूत सुविधांचे नियोजन
.रस्ते , वाहतूक, स्वच्छता आणि निवासाच्या सुविधांवर विशेष भर
.स्थानिक पर्यटन व अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे शासनाचे उद्दिष्ट्

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत