Headlines

टीम इंडियासाठी आणखी एक वाईट बातमी; बुमराहनंतर धडाकेबाज फलंदाजही सीरिजबाहेर, टॉप ऑर्डरच कमकुवत!


Sai Sudharsan Out : श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला आता मोठा धक्का बसला आहे. कसोटी मालिकेला सुरुवात करण्याआधी श्रीलंका आणि भारत यांच्या प्लेइंग ११ मध्ये सराव सामना सुरु आहे. पण याच दरम्यान आता भारताचा आणखी एक स्टार फलंदाज मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.

Sai Sudharsan Injured
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : श्रीलंकेविरुद्ध १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघातील तरुण आणि फॉर्ममध्ये असलेला डाव्या हाताचा फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. अलीकडच्या काळात देशांतर्गत आणि रेड-बॉल क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सुदर्शनचे अचानक बाहेर जाणे भारतीय फलंदाजीसाठी मोठा फटका मानला जात आहे.

साई सुदर्शन बाहेर; नंबर ३ चे समीकरण बदलले

साई सुदर्शन कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यामुळे आता भारतीय संघाच्या ‘प्लेइंग ११’मधील तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीचे गणित पूर्णपणे बदलले आहे. सराव सामन्यात श्रीलंका क्रिकेट ११ विरुद्ध १०३ धावांची शानदार शतकीय खेळी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलचा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. सुदर्शनच्या अनुपस्थितीत पडिक्कलला कसोटी संघात स्वतःला सिद्ध करण्याची ही मोठी आणि सुवर्णसंधी मानली जात आहे.

Maharashtra TimesDevdutt Padikkal : टीम इंडियाला टॉप ऑर्डरसाठी मिळाला भरवशाचा फलंदाज, देवदत्तने श्रीलंकेला कुटत शतक ठोकलं; पण १०३ वर रिटायर्ड हर्ट का?

जबरदस्त फॉर्ममध्ये होता साई सुदर्शन

आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना ७०० हून अधिक धावा करणाऱ्या साई सुदर्शनचे अशा ऐनवेळी बाहेर पडणे संघाला चिंतेत टाकणारे आहे. जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ८१ धावांची झुंझार खेळी केली होती. त्यानंतर २८ जुलै रोजी जाहीर झालेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला होता, मात्र त्याची निवड फिटनेस क्लिअरन्सवर अवलंबून होती.

Maharashtra TimesRishabh Pant : ऋषभ पंतला मुळांची ओढ! दिल्ली सोडून उत्तराखंडमध्ये पहिलं घर बांधायचंय, जमीन शोधून द्या; मध्यरात्री थेट मुख्यमंत्र्यांना ट्वीट

सलग झळकावली होती शतके

साई सुदर्शन ४ ऑगस्ट रोजी भारतीय संघाच्या इतर सहकाऱ्यांसोबत श्रीलंकेला रवाना झाला नव्हता आणि तो शनिवारी कोलंबोमध्ये संघात सामील होईल अशी अपेक्षा होती. मात्र, आता तो या अत्यंत महत्त्वाच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे. जून-जुलैमध्ये भारत-अ संघाकडून खेळताना श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही अनधिकृत कसोटी सामन्यांच्या पहिल्या डावात त्याने शतके झळकावली होती. त्याचा हा भन्नाट फॉर्म पाहता त्याचे मालिकेबाहेर होणे टीम इंडियासाठी मोठे नुकसान आहे.

सुदर्शन बाहेर पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष बीसीसीआयच्या निवड समितीकडे लागले आहे. येत्या काही दिवसांत निवड समिती साई सुदर्शनचा पर्याय म्हणून एखाद्या नव्या खेळाडूच्या नावाची घोषणा करू शकते.