भारताची स्टार बॉक्सर लव्हलिनी बोरगोहेनने ग्लासगोमधल्या रेस्टॉरंटच्या मेनूवरील भारताच्या नकाशामध्ये ईशान्य भारताचा समावेशच नसल्याबाबत आक्षेप नोंदवला होता. त्या प्रकरणावरुन पीएम मोदींनी तिचे कौतुक केले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ग्लासगोमधील एका रेस्टॉरंटमध्ये लावलेल्या भारताच्या नकाशामधील मोठी चूक सर्वांच्या लक्षात आणून देणारी भारताची स्टार बॉक्सर रौप्यपदक विजेती लव्हलिना बोरगोहेन हिचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लव्हलिनाचे खास अंदाजात कौतुक केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आज पदकविजेत्या खेळाडूंबरोबर गप्पा केल्या. खेळाडूंच्या त्यांच्या खेळांसाठीची तयारी आणि ग्लासगोमधील त्यांचे अनुभव त्यांनी ऐकून घेतले. पीएम मोदींच्या कार्यालयाकडून या भेटीचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ७५ किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक जिंकलेल्या लव्हलिनाला यावेळी एक प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं की, “काय झाले होते, तू रेस्टॉरंट मालकाशी भांडलीस का?”
त्यानंतर लव्हलिनानेही मोदींना हसून उत्तर दिले की, “तो एक आनंदाचा प्रसंग होता. आम्ही उत्सव साजरा करत होतो आणि मला देशाचा चुकीचा नकाशा दिसला. मी त्यांना नम्रपणे सांगितले आणि त्यांनी तो लगेच बदलला.”
मोदींनी तिचे खास शब्दात कौतुक केले. ते म्हणाले की, जेव्हा तू विजय साजरा करत होती, तेव्हाही तू सजग होती. “खेळांच्या समारोपाच्या वेळी आणि उत्सवाच्या धामधुमीत देशाच्या नकाशाचे महत्त्व ओळखणे हे खूप शहाणपणाचे लक्षण आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, तो व्हिडिओ सामान्य नव्हता. लोक त्याला दीर्घकाळ लक्षात ठेवतील.”
राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा सुरु होती. भारताने बॉक्सिंगमध्ये १० पदकं जिंकली होती, त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी भारतीय बॉक्सर ग्लासगोतील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते. तेव्हा तिथे मोठा वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळाला. आसामची स्टार बॉक्सर लव्हलिनाने मेन्यू कार्ड पाहिले, ज्यामध्ये मेन्यूच्या बाजूस दिलेल्या भारताच्या नकाशात ईशान्य भारताचा भागच नव्हता. असा नकाशा पाहिल्यावर बॉक्सरला वेदना झाल्या. तिच्या मनाला वाईट वाटलं. तिने लगेच रेस्टॉरंट व्यवस्थापनाकडे हा मुद्दा गंभीरपणे मांडला.
तिने सांगितलं की, “कृपया याचा चूकिचा अर्थ घेऊ नका पण मला हे पाहून खूप दुःख होत आहे. भारताच्या नकाशातून ईशान्य भारत गायब आहे. बाहेरच्या नकाशावरही तसंच दिसत आहे. ईशान्य भारताची नागरिक म्हणून मला हे चित्र पाहून प्रचंड दुःख होते आहे. कृपया याबाबत भविष्यात काळजी घ्यावी.” बॉक्सरचा हा मुद्दा रेस्टॉरंटप्रमुखांनीही लक्षात घेतला आणि सांगितलं की, आम्ही तात्काळ यामध्ये बदल करु.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा