Headlines

खिशात मोबाईलचा स्फोट, शिक्षकाचा जागीच मृत्यू; एक जण जखमी, गोंदियातील घटनेनं खळबळ – school teacher died and one person was injured over mobile phone exploded in gondia pri


Gondia Mobile Blast: साकोली तालुक्यातील सानगडी येथे शुक्रवारी आठवडी बाजार होता. सुरेश संग्रामे आणि नत्थू गायकवाड हे दोघेही या बाजारासाठी गेले होते.

mobile blast
mobile blast(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,गोंदिया: शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलचा अचानक स्फोट होऊन शुक्रवारी सायंकाळी एका शिक्षकाचा मृत्यू झाला. तर एक व्यक्ती जखमी झाली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगाव-सानगडी मार्गावरील केसलवाडा फाटा परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुरेश भिकाजी संग्रामे (रा. टोला सिरेगाव) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. तर नत्थू गायकवाड असे जखमी नातेवाइकाचे नाव आहे.

साकोली तालुक्यातील सानगडी येथे शुक्रवारी आठवडी बाजार होता. सुरेश संग्रामे आणि नत्थू गायकवाड हे दोघेही या बाजारासाठी गेले होते. बाजार करून परत गावी येत असताना सिरेगाव ते सानगडी मार्गावरील केसलवाडा फाटा परिसरात सुरेश यांच्या शर्टच्या वरच्या खिशात असलेल्या मोबाइलचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे त्यांच्या छातीचा काही भाग जळाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले गायकवाड हे गाडीवरून खाली पडल्याने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मृतक संग्रामे हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या देसाईगंज-वडसा पंचायत समीतीअंतर्गत जि. प. उच्च प्राथमिक शाळा कसारी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.
Maharashtra Timesपालिका निवडणुका लवकरच! मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार
दरम्यान, गायकवाड यांना मोबाइल स्फोटाबाबत विचारले असता याबाबत काहीच आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी गाडीवरून खाली पडलो. त्यानंतर काही लोकांनी मला रुग्णालयात दाखल केले,’ अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
Maharashtra Timesआता मंत्रिपदे, खात्यांवर खल; शिवसेनेला १०, तर ‘राष्ट्रवादी’ला सात कॅबिनेट मंत्रिपदे?
‘साकोली येथे संग्रामे यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या छातीजवळचा काही भाग जळाला आहे. त्यांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल,’ असे पोलिसांनी सागितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा