Headlines

काही महिन्यांपूर्वीच मुंबईत घेतलं अलिशान घर, अभिनेत्रीच्या चार कोटींच्या घरात पाणीच पाणी; व्हिडिओ शेअर करत सांगितलं काय घडलं


मुंबई: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचले असून सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना याचा फटका बसला बसल्याचं दिसत आहे. आता एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या अलिशान घरातही पाणी शिरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

हिंदी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १९’ फेम अशनूर कौर हिच्या मुंबईतील आलिशान घरात पाणी शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशनूरनं स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर घराचा व्हिडिओ शेअर करत या परिस्थितीची झलक दाखवली आहे.

बाल्कनीतून थेट लिव्हिंग रूममध्ये आलं पाणी
अशनूरनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या घराची झालेली अवस्था स्पष्ट दिसत आहे. पाणी तिच्या घराच्या बाल्कनीला पार करून थेट लिव्हिंग रूमपर्यंत म्हणजेच हॉलमध्ये आलं. संपूर्ण घरात पाणी पाणी झाल्यामुळं एकच तारांबळ उडाली.

नवीन फर्निचरचं नुकसान
अशनूरनं नुकतंच तिच्या घराचं इंटिरिअर केलं होतं. यात तिनं अनेक महागडं फर्निचरही घेतलं होतं. पावसाच्या पाण्यामुळं आता महागडे फर्निचर आणि वस्तू खराब होऊ नयेत म्हणून तिनं तातडीनं मदतनीस बोलवून घरातील पाणी बाहेर काढलं.

हाऊसकीपिंग स्टाफनं केली मदत
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अशनूरच्या घरातील हाऊसकीपिंग स्टाफ आणि इतर सदस्य वाईपर्स, मॉपर आणि व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीनं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हॉलमधील महागडं कारपेट खराब होऊ नये म्हणून ते आधीच गुंडाळून बाजूला ठेवण्यात आलं होतं.

हा व्हिडिओ शेअर करत अशनूरनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, मला एका इव्हेंटसाठी बाहेर पडायचं आहे आणि घरात हे असं झालंय…”त्यानंतर तिने आणखी एक ओळ जोडली, “माझ्यावर लागलेली सर्व ‘नजर’ आनंद, यश आणि प्रगतीमध्ये बदलू दे.

Ashnoor Kaur

मुसळधार पावसासोबतच पाईप फाटल्यामुळे झाली दुर्घटना
सुरुवातीला चाहत्यांना वाटलं की हे केवळ मुंबईच्या मुसळधार पावसामुळं झालं आहे. मात्र, काही तासांनंतर अशनूरनं सोशल मीडियावर दुसरी पोस्ट शेअर करत खरी परिस्थिती स्पष्ट केली. तिनं सांगितले की, हे पाणी थेट पावसाचे नसून सोसायटीत पाईप फुटल्यामुळे घरात पाणी शिरलं होतं. हाऊसकीपिंग टीमच्या तत्परतेमुळं काही मिनिटांतच परिस्थिती नियंत्रणात आली आणि घराचे कोणतंही मोठं नुकसान झालं नाही, असंही तिनं सांगितलं. तिनं काळजी व्यक्त करणाऱ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Maharashtra TimesBol Bol Rani: हिंदी चित्रपटांना टक्कर, डोक्याचा भुगा करणारा मराठी सिनेमा ‘बोल बोल राणी’ चा ट्रेलर, सई ताम्हणकरच्या भूमिकेची उत्सुकता

१९ व्या वर्षी खरेदी केलं होतं ४ कोटींचे घर

अशनूर कौरनं काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री फराह खानच्या व्लॉगमध्ये तिच्या या आलिशान घराची टूर दिली होती. अवघ्या १९ व्या वर्षी तिनं हे ३. ५ BHK चं घर खरेदी केलं होतं, ज्याची किंमत साधारण ४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येतं.

Maharashtra TimesKhashaba Teaser: ‘खाशाबा’चा टीझर समोर, मुख्य भूमिकेतील अभिनेता गुलदस्त्यात,पण नागराज मंजुळेंच्या भूमिकेनं वेधलं लक्ष
करिअरबद्दल बोलायाचं झालं तर बालकलाकार म्हणून ‘झांसी की रानी‘ मालिकेतून कारकिर्दीची सुरुवात करणारी अशनूर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘पटियाला बेब्स’ सारख्या मालिकांमुळं घराघरांत पोहोचली आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत