Headlines

Indian Youth Dies In US: बुडणाऱ्या मित्रांना जीवदान देताना अमेरिकेत अनुरुपचा करुण शेवट; मासेमारीच्या जाळ्यानं घात


Indian Youth Dies In US: मित्रांसोबत पार्कमध्ये कॅम्पिंगला गेलेल्या २३ वर्षीय अनुरुपचा करुण शेवट झाला. त्याच्या अकाली निधनानं कुटुंबाला धक्का बसला आहे. अनुरुपनं तिघांना जीवदान दिलं. मात्र तो स्वत:ला वाचवू शकला नाही.

indian youth dies in us
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन: अमेरिकेत भारतीय तरुणाचा दुर्दैवी शेवट झाला आहे. नदीत मासेमारी करायला गेलेल्या तीन मित्रांना वाचवताना २३ वर्षीय कोडरु अनुरुप रेड्डीनं जीव गमावला. तो मूळचा तेलंगणाचा रहिवासी होता. अनुरुप रेड्डी यांचं शव राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आलं. त्यानंतर ते अब्दुल्लापुरनमेटच्या कवादिपल्ली गावात नेण्यात आलं. तिथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमेरिकेच्या लुईसियानातील टोरो बायू पार्कमध्ये २९ मे २०२६ रोजी अनुरुपचा मृत्यू झाला. तो त्याच्या मित्रांसोबत कॅम्पिंगला गेला होता. यावेळी त्याचे ३ मित्र मासे पकडताना सबाईन नदीत पडले. त्यांना वाचवण्यासाठी अनुरुपनं नदीत उडी घेतली. मित्रांना वाचवण्यात त्यांना यश आलं. पण तो स्वत: मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यात अडकला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. मित्रांसाठी जीव पणाला लावणारा अनुरुप नालगोंडा जिल्ह्यातील शालिगोवराराम येथील अब्दुल्लापुरमेटचा रहिवासी होता.
Maharashtra TimesUS Attack Oil Tanker: हल्ला झालाय, आग लागलीय, जहाज बुडतंय! USच्या हल्ल्यानंतर 24 भारतीय संकटात, मदतीसाठी SOS कॉल
अनुरुप २०२४ मध्ये अमेरिकेला गेला होता. नॉर्थ टेक्सास विद्यापीठातून त्यानं नुकतंच कॉम्प्युटर सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं. त्याला नोकरीदेखील मिळाली होती. महिन्याच्या अखेरीस तो नोकरीवर रुजू होणार होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अनुरुपनं दाखवलेल्या धाडसाचं कौतुक करत प्रशस्तीपत्रक पाठवलं आहे. ‘२३ वर्षीय अनुरुपनं त्याच्या मित्रांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून अनन्यसाधारण धाडस दाखवलं. मित्रांचा जीव वाचवण्यासाठी त्यानं बलिदान दिलं. यातून माणसुकीची सर्वोच्च मूल्यं दिसली,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री रेड्डी यांनी अनुरुपच्या साहसाचं कौतुक केलं.
Maharashtra TimesAir Canada Pilot: 16 वर्षांचं करिअर, 900 उड्डाणं; पायलटबद्दल महत्त्वाचा उलगडा, लाखो प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला
मुख्यमंत्री रेड्डी यांनी अनुरुपचे आई-वडील राजेंद्र रेड्डी आणि दुर्गाभवानी, भाई आश्रित रेड्डी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. राज्य सरकारकडून कुटुंबाला सर्वोतोपरी मदत केली जाईल, असा शब्द रेड्डी यांनी दिला. अनुरूपचं पार्थिव मायदेशी आणण्यात भोंगिरचे खासदार किरण कुमार रेड्डी यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी भारतीय दूतावास आणि तेलंगणाच्या नॉन रेसिडेंट्स मायग्रंट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी समन्वय राखला. राज्य सरकारकडून अनुरूपचं पार्थिव आणण्याची व्यवस्था करण्यात आली. अनुरूपचं पार्थिव विमानतळावरुन विशेष रुग्णवाहिकेनं विमानतळाहून कवादिपल्लीला नेण्यात आलं.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा