Ben Stokes Retirement News : न्यूझीलंडविरूद्ध कसोटी सामना सुरू असताना बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ट्रेंट ब्रिजवर न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टेस्ट मॅचनंतर 35 वर्षीय स्टोक्स क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी स्टोक्सने ड्रेसिंग रूममध्ये संघातील खेळाडूंना हा निर्णय कळवला.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टोक्सला ‘टीमचा सर्वात प्रेरणादायी कर्णधार आणि महान खेळाडू’ अशी पोस्ट केली आहे. केला. योगायोग म्हणजे, निवृत्तीची अधिकृत घोषणा होताच स्टोक्सने पुढच्याच चेंडूवर न्यूझीलंडचा फलंदाज झकारी फाउलकेसला बाद करून आपला क्लास दाखवला. लंडनमधील नाईट क्लब प्रकरणामुळे दुसरी टेस्ट मुकलेल्या स्टोक्सने या सामन्यात कर्णधार म्हणून पुनरागमन केले होते. मी या टीमसाठी नेहमी सर्वस्व दिलं. आता शेवटचे दोन दिवसही सगळ्यांनी तसंच झोकून द्यावं. मी मैदान सोडताना टीमने सर्वस्व पणाला लावल्याचं समाधान घेऊन जावं, हीच इच्छा असल्याचं निवृत्तीवर बेन स्टोक्स म्हणाला. स्टोक्सच्या या अचानक निर्णयाने अनेक चाहते नाराज झाले आहेत. IND W vs AUS W : याला म्हणतात कॅप्टन! हरमनप्रीतचा ऑस्ट्रेलियाला दणका, 25 चेंडूत फिफ्टी ठोकत महिला टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच… बेन या टीमसाठी सर्वात प्रेरणादायी कर्णधार, लीडर आणि दिग्गज आहे. कोणत्याही टीमला असा कर्णधार लाभावा अशीच अपेक्षा असते. तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, अशी भावनिक पोस्ट इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केली आहे. इंग्लंडला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात बेन स्टोक्स याची भूमिका महत्त्वाची राहिली होती. अॅशेसमधील एकट्याच्या दमावर संघाला त्याने जिंकवलं होतं तो कसोटी सामना प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या कायम लक्षात राहणार असणार आहे. IND vs IRE : नाद केला पण वाया नाही गेला! डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादव याने बुमराहला मागे टाकत रचला इतिहास दरम्यान, बेन स्टोक्सने इंग्लंडसाठी १२२ कसोटी, ११४ एकदिवसीय आणि ४३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ७२२८ धावा केल्या असून २४६ बळी घेतले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३४६३ धावा आणि ७४ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत स्टोक्सने ५८५ धावा केल्या आणि २६ विकेट घेतल्यात. कर्णधार म्हणून त्याने इंग्लंडला ४४ कसोटी सामन्यांत नेतृत्व केले, ज्यापैकी २४ सामन्यांत इंग्लंडला विजय मिळवून दिला.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा