Ratnagiri News: कोकणात आता सणांची लगबग सुरू झालेली असताना मुंबई गोवा महामार्गाची मात्र चांगलीच अवस्था झाल्याच चित्र पहायला मिळतय .अशातच कोकणासह राज्यातील बॅल्क स्पॉट निश्चित केले गेलेत.यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर एकूण २० ब्लॅक स्पॉट तर पळस्पे ते पोलादपूर १७ ब्लॅक स्पॉट रत्नागिरी जिल्ह्यात २ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ब्लॅक स्पॉट,राष्ट्रीय महामार्गावर ५७३ तर अन्य महामार्गावर १२५ ब्लॅक स्पॉट महामार्ग पोलीस व राज्य पोलिस वाहतूक विभागाने निश्चित केले .

रत्नागिरी ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक स्पॉट निश्चित
रत्नागिरी जिल्ह्यात खेड भोस्ते ,हातखंबा गाव ही 2 दोन ठिकाण ब्लॅक स्पॉट आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली जानवली हॉटेल येथे 1 ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर एकूण 20 ठिकाणी ब्लॅक स्पॉट म्हणजेच अपघातांची धोक्याची ठिकाणे आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधकाम विभाग तातडीने या ठिकाणांची दुरुस्ती कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार असा खडा सवाल आता वाहन चालक, प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील बॅल्क स्पॉट
रायगड जिल्ह्यात पोलादपूर ते पळस्पे फाटेपर्यंतच्या ब्लॅक स्पॉटची नावे – पेण , तरणखोप, रामवाडी, वाशी फाटा, वडखळ, डोलवी नागोठणे; सुकेळी खिंड, शेठ पळस, गोरेगाव रेपोली,लोणेरे, टेम्पाले, तळेगाव पेट्रोल पंप माणगाव,कशेणे महाड टेमपाले ते लाख पाले, लाख पाले ते पहेल, वीरपोलादपूर, चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले गाव ही ब्लॅक स्पॉट म्हणजेच धोकादायक ठिकाणी आहेत.
अपघातांची ठिकाणी निश्चित करून ब्लॉक स्पॉट निश्चित केले आहेत
राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी कोकणासह महाराष्ट्र राज्यातील मुख्य महामार्गावर असलेली अपघातांची ठिकाणी निश्चित करून ब्लॉक स्पॉट निश्चित केले आहेत. त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन उपाययोजना केली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर 573 ठिकाणांचा समावेश असून अन्य मार्गांवरती एकूण 125 ठिकाणी ब्लॅक स्पॉट यादी राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी तयार केली आहे.क्षित व्हावा यासाठी राज्य पोलीस व महामार्ग पोलीस, राज्य वाहतूक विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग (NH) बॅल्क स्पॉट
यामध्ये राज्यातील अहिल्यानगर 37, बीड 29 , भंडारा 6, छत्रपती संभाजी नगर 24, चंद्रपूर 7, धाराशिव धुळे 44, गोंदिया 19, हिंगोली 16, जालना 11, कोल्हापूर 18, नागपूर ग्रामीण 14, नांदेड 28, नंदुरबार 12, नाशिक ग्रामीण 55, पालघर 14, परभणी 6, पुणे ग्रामीण 7, रायगड 28, रत्नागिरी 3, सांगली 6 , सातारा 6, सिंधुदुर्ग 1, सोलापूर ग्रामीण 12, ठाणे ग्रामीण 15, वर्धा 15, वाशिम 1, यवतमाळ 7
राज्य महामार्ग ब्लॅक स्पॉट
अमरावती ग्रामीण 13, बीड 11, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 8, चंद्रपूर 1, धुळे 19, गोंदिया 1, हिंगोली 9, कोल्हापूर 9, नांदेड 2, नंदुरबार 4, नाशिक ग्रामीण 22, पालघर 1,सांगली 2 , वर्धा 4
अन्य राज्यमार्ग ,राज्य महामार्ग ( एमडीआर)
हिंगोली 3, कोल्हापूर 11, नाशिक ग्रामीण 2,
अमरावती ग्रामीण 1, धुळे 4,एक्सप्रेस वे
भंडारा 1, रायगड जिल्ह्यात 17 ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत

