Headlines

उर्मिला कानेटकरचं हिरव्या साडीतील ग्लॅमरस अंदाज; चाहते म्हणाले खूप सुंदर…मनमोहिनी – marathi actress urmila kanetkar green saree look see her latest look


मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकरचा हिरव्या साडीतील ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज आणि ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीच्या सुंदर कॉम्बिनेशनने तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं.उर्मिलाच्या या मनमोहक अंदाजावर चाहते फिदा झाले असून कमेंट्समधून तिचं भरभरून कौतुक करत आहेत.

हिरव्या साडीतील उर्मिलाचा मनमोहक अंदाज
साडी हा भारतीय स्त्रीच्या सौंदर्याला खुलवणारा पारंपरिक पोशाख मानला जातो. विशेषतः हिरवा रंग साडीला एक वेगळीच आकर्षकता देतो. उर्मिलानेही याच रंगाची निवड करत आपल्या लूकमध्ये पारंपरिक सौंदर्य आणि ग्लॅमर यांचा सुरेख मिलाफ साधला आहे. हिरव्या साडीच्या विविध छटा तिच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देताना दिसतात. साडीची नेसणी, त्यासोबतचे दागिने आणि एकंदर स्टायलिंग यामुळे तिचा लूक अधिकच खुलून आला आहे. पारंपरिक पोशाख असूनही त्यामध्ये आधुनिक आणि ग्लॅमरस टच जाणवतो. त्यामुळे उर्मिलाचा हा लूक चाहत्यांना विशेष पसंत पडत असल्याचं दिसतं.
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानेटकर आपल्या अभिनयासोबतच तिच्या साध्या, आकर्षक आणि स्टायलिश लूकसाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. पारंपरिक साडी असो किंवा मॉडर्न फॅशन, उर्मिलाचा प्रत्येक अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो. नुकताच तिचा हिरव्या साडीतील ग्लॅमरस लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. हिरव्या रंगाची साडी, त्याला साजेसा पारंपरिक आणि देखणा मेकअप, खुलून दिसणारी हेअरस्टाइल आणि चेहऱ्यावरचं मोहक हास्य अशा लूकमध्ये उर्मिला अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या लेटेस्ट लूकची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळताच चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं वर्णन करताना “खूप सुंदर”, “मनमोहिनी” अशा कमेंट्स केल्या आहेत. (फोटो सौजन्य :- @urmilakothare)

हिरव्या साडीतील उर्मिलाचा मनमोहक अंदाज

हिरव्या साडीतील उर्मिलाचा मनमोहक अंदाज

साडी हा भारतीय स्त्रीच्या सौंदर्याला खुलवणारा पारंपरिक पोशाख मानला जातो. विशेषतः हिरवा रंग साडीला एक वेगळीच आकर्षकता देतो. उर्मिलानेही याच रंगाची निवड करत आपल्या लूकमध्ये पारंपरिक सौंदर्य आणि ग्लॅमर यांचा सुरेख मिलाफ साधला आहे. हिरव्या साडीच्या विविध छटा तिच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देताना दिसतात. साडीची नेसणी, त्यासोबतचे दागिने आणि एकंदर स्टायलिंग यामुळे तिचा लूक अधिकच खुलून आला आहे. पारंपरिक पोशाख असूनही त्यामध्ये आधुनिक आणि ग्लॅमरस टच जाणवतो. त्यामुळे उर्मिलाचा हा लूक चाहत्यांना विशेष पसंत पडत असल्याचं दिसतं.

ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीने लूकला दिला खास टच

ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीने लूकला दिला खास टच

उर्मिला कानेटकरच्या हिरव्या साडीतील लूकमध्ये तिच्या ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक साडीला तिने उठावदार दागिन्यांची साथ दिल्यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच आकर्षक आणि देखणा दिसत आहे. विशेष म्हणजे, ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीमुळे तिच्या पारंपरिक लूकमध्ये एक वेगळाच रॉयल आणि एथनिक अंदाज पाहायला मिळतो.
हिरव्या रंगाच्या साडीवर ऑक्सिडाईज्ड दागिने खुलून दिसतात. गळ्यातील आकर्षक नेकपीस, कानातील झुमके आणि इतर दागिन्यांची निवड तिच्या लूकला परिपूर्ण बनवताना दिसते. स्लीव्हलेस ब्लाऊजसोबत या दागिन्यांची केलेली स्टायलिंग तिच्या फॅशन सेन्सची झलक दाखवते.उर्मिलाने या लूकमध्ये दागिन्यांचा वापर अगदी योग्य प्रमाणात केला आहे. त्यामुळे ज्वेलरी उठून दिसत असतानाच तिच्या साडीचे सौंदर्यही कायम राहते. पारंपरिक साडी, स्टायलिश स्लीव्हलेस ब्लाऊज आणि ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी यांचं कॉम्बिनेशन तिच्या या लूकचं खास आकर्षण ठरत आहे.

साधेपणातही दिसतोय ग्लॅमर

साधेपणातही दिसतोय ग्लॅमर

उर्मिलाच्या या लूकचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील संतुलन. अतिशय भडक किंवा जड स्टायलिंग न करता तिने आपल्या नैसर्गिक सौंदर्याला प्राधान्य दिल्याचं जाणवतं. चेहऱ्यावरचा मेकअपही तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा दिसतो. डोळ्यांचा मेकअप आणि ओठांवरील रंग यामुळे तिच्या चेहऱ्यावरील भाव अधिक उठून दिसतात.
तिच्या केसांची स्टायलिंगही या पारंपरिक लूकला पूरक ठरते. साडी, दागिने, मेकअप आणि हेअरस्टाइल यांचा मेळ साधल्यामुळे संपूर्ण लूक आकर्षक दिसत आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर तिच्या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतो.

साडीतील लूक ठरतोय खास

साडीतील लूक ठरतोय खास

उर्मिलाच्या हिरव्या साडीतील फोटोंमध्ये तिचा आत्मविश्वास आणि सौंदर्य दोन्ही ठळकपणे जाणवत आहे. साडीचा रंग आणि तिचं व्यक्तिमत्त्व यांचं कॉम्बिनेशन विशेष उठून दिसतं. पारंपरिक भारतीय पेहरावाला ग्लॅमरस अंदाजात सादर करण्याची तिची शैली चाहत्यांना भावते.आजच्या काळात अभिनेत्रींच्या फॅशन लूक्सकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असतं.

स्लिव्हस्लेस ब्लाऊजने वेधले लक्ष

स्लिव्हस्लेस ब्लाऊजने वेधले लक्ष

उर्मिला कानेटकरच्या हिरव्या साडीतील लूकची आणखी एक खासियत म्हणजे तिचा स्लीव्हलेस ब्लाऊज. हिरव्या साडीला तिने मॉडर्न कटच्या स्लीव्हलेस ब्लाऊजची जोड दिल्यामुळे पारंपरिक लूकला ग्लॅमरस टच मिळाला आहे. ब्लाऊजची स्टायलिश डिझाइन आणि साडीची नेसणी यामुळे तिचा संपूर्ण अंदाज अधिकच आकर्षक दिसत आहे.साडीचा पारंपरिक बाज कायम ठेवत उर्मिलाने ब्लाऊजच्या माध्यमातून आपल्या फॅशन सेन्सची झलक दाखवली आहे. तिच्या या लूकमध्ये साधेपणा आणि ग्लॅमर यांचा सुंदर समतोल पाहायला मिळतो. त्यामुळेच चाहत्यांचं लक्ष तिच्या साडीपेक्षा तिच्या स्लीव्हलेस ब्लाऊजच्या स्टायलिंगकडेही वेधलं गेलं आहे.

चाहत्यांच्या कमेंट्सचीही चर्चा

चाहत्यांच्या कमेंट्सचीही चर्चा

उर्मिला कानेटकरचा कोणताही नवा फोटो समोर आला की तिचे चाहते त्यावर प्रतिक्रिया देताना दिसतात. यावेळी हिरव्या साडीतील तिच्या लूकने चाहत्यांना अक्षरशः भुरळ घातली आहे. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत कमेंट्स केल्या आहेत. “खूप सुंदर”, “मनमोहिनी”, “नेहमीप्रमाणेच अप्रतिम”, “हिरव्या रंगात खूपच सुंदर दिसताय”, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया चाहत्यांकडून पाहायला मिळत आहेत. काही चाहत्यांनी तिच्या पारंपरिक लूकचं विशेष कौतुक केलं आहे, तर काहींनी तिच्या स्माईलवर आणि एकंदर व्यक्तिमत्त्वावर प्रेम व्यक्त केलं आहे.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा