उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारही फुटणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. सचिन अहिर यांच्या पाठोपाठ इतर आमदारही शिंदेसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांची प्रगती पाहून पक्षप्रवेश होत असल्याचे दळवी यांनी म्हटले.रायगडमधील तटकरे विरुद्ध शिवसेना या संघर्षाबाबतही दळवींनी मोठे विधान केले. तटकरे विरुद्ध शिवसेना हा वाद यापुढेही असाच राहणार असे दळवी म्हणाले.