Headlines

आर्थिक अडचणींमुळे मेंदू वेगाने होतो वृद्ध:वयाची पन्नाशी गाठताच घटू लागते स्मरणशक्ती; गोष्टी समजून घेण्याची क्षमताही होते कमी…




आर्थिक अडचणी केवळ आपली जीवनशैली प्रभावित करत नाहीत, तर त्या आपल्या मेंदूलाही वेळेपूर्वी वेगाने वृद्ध बनवतात. तसेच वयाच्या ५० व्या वर्षीच स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते आणि गोष्टी समजून घेण्याची क्षमताही सामान्यापेक्षा कमी होते. ही धक्कादायक माहिती युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) च्या संशोधकांच्या ७० वर्षे चाललेल्या अभ्यासातून समोर आली आहे. हे संशोधन ‘इनोव्हेशन इन एजिंग’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. यानुसार, कामाच्या आयुष्यात दीर्घकाळ पैशांची कमतरता आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्यांच्या वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्यावर मेंदूच्या कार्यक्षमतेच्या वेगात मोठी घसरण होते. संशोधकांनी १९४६ मधील ब्रिटनच्या नॅशनल सर्व्हे ऑफ हेल्थ अँड डेव्हलपमेंटमध्ये सहभागी असलेल्या सुमारे २,८०० सहभागी लोकांच्या २६ ते ५३ वर्षांपर्यंतच्या उत्पन्नाची आकडेवारी आणि आर्थिक अडचणींचे विश्लेषण केले. यूसीएलचे डॉ. जॅक वेल्स यांनी सांगितले, ‘आमच्या दशकांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, अल्पकालीन नाही तर अनेक वर्षे सातत्याने राहणाऱ्या आर्थिक अडचणीच मेंदूच्या आरोग्याला सर्वात जास्त नुकसान पोहोचवतात. ७० वर्षे वयात केलेल्या ब्रेन स्कॅनमध्ये सातत्याने कमी उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये ‘व्हेंट्रिक्युलर व्हॉल्युम’ वाढलेले आढळले, जे मेंदूच्या उतींचे नुकसान म्हणजेच मेंदू आकुंचन पावण्याचे मोठे लक्षण आहे.’ पुरुषांवर अधिक परिणाम: आर्थिक तणावाचा परिणाम ३ गटांवर जास्त आणि घातक दिसून आला- १. पुरुष: महिलांच्या तुलनेत सातत्याने आर्थिक अडचणी सहन करणाऱ्या पुरुषांचा मेंदू वेगाने आकुंचित पावला. २. गरीब बालपण असलेले प्रौढ: जे लोक लहानपणी गरीब कुटुंबात लहानाचे मोठे झाले त्यांच्या मेंदूचा स्मरणशक्तीशी संबंधित भाग ‘हिप्पोकॅम्पस’ वेगाने कमकुवत झाला. ३. आनुवंशिक : अल्झायमर आजाराचा आनुवंशिक धोक्यातील लोकांत आर्थिक अडचणींने मेंदूत ‘अमायलॉइड प्रोटीन’ जमा होणे, ब्रेन व्हॉल्यूमचे नुकसान वेगाने झाल्याचे आढळले. आर्थिक मदत आणि गरिबी घटवणे डिमेंशिया रोखण्यात प्रभावी संशोधनात सहभागी ज्या लोकांचे कौटुंबिक उत्पन्न दीर्घकाळ कमी राहिले, त्यांच्या मेंदूत व्हेंट्रिक्युलर व्हॉल्यूम जास्त आढळले. व्हेंट्रिकल्स या मेंदूच्या आतील द्रवाने भरलेल्या पोकळ्या असतात. या वाढणे हे मेंदूच्या उतींचे नुकसान झाल्याचे लक्षण मानतात. जगागत विस्मृतीच्या आजाराचे (डिमेंशिया) रुग्ण ३० वर्षांत तिप्पट वाढून १५ कोटी होण्याची शक्यता आहे. संशोधनाच्या सहलेखिका प्रा. प्रवीथा पटाले यांचे म्हणणे आहे की, लोकांना गरिबीतून बाहेर काढणे व आर्थिक सुरक्षा देणे हे भविष्यात डिमेंशिया रोखण्याचा प्रभावी मार्ग ठरू शकतो.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत