ishan kishan News : आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये जवळपास एक वर्ष नंबर असलेल्या अभिषेक शर्मा याला तगडा झटक बसला आहे. भारताचाच एका मॅचविनर खेळाडू नंबर वन ठरला आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, अभिषेकनंतर तो अशी कामगिरी करणारा चौथाच खेळाडू ठरलाय, कोण आहे?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयसीसी रँकिंग जाहीर झाली असून आताच पार पडलेल्या आयर्लंडविरूद्धच्या मालिकेत भारताला २-० ने व्हाईटवॉश मिळाल होता. त्यामुळे भारताला याचा फटका बसणार अशी भीती होती. मात्र भारतीय पुरूष संघ वनडे आणि टी-२० मध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र या मालिकेनंतर टी-२० बॅटिंग रँकिंगमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. एक वर्षापासून नंबर वन असलेल्या अभिषेक शर्माला याचा फचका बसला आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांच्यानंतर पहिले स्थान गाठणार चौथा भारतीय होण्याचा मान एका मॅचविनर खेळाडूने मिळवला आहे.
आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेड हा नंबर वनचा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये झालेल्या ट्रेंट ब्रिज येथील कसोटी सामन्यामध्ये हॅरी ब्रूक आणि जो रूट काही खास कागिरी करू शकले नाहीत. याचा परिणाम रँकिंगरवर झाला. ब्रूक आणि रूट यांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाल्याने हेड नंबर वन ठरला आहे. बॉलिंमध्येही मॅट हेन्री दुसऱ्या स्थानी गेल्याने जसप्रित बुमराह पहिल्या स्थानी गेला आहे. बुमराहचे ८७० आणि हेन्रीचे ८६१ गुण झाले आहेत.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा