Headlines

हॉकी वर्ल्डकपमधून भारत बाहेर, अर्जेंटिनानकडून पराभव; शेवटचा वर्ल्डकप केव्हा जिंकलेला?


Hocky India vs Argentina Match : पुरुष हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताचे आव्हान उपांत्य फेरीपूर्वीच संपुष्टात आले आहे. निर्णायक सामन्यात अर्जेंटिनाने भारताचा ५-३ असा पराभव केला. राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीचा वर्ल्डकप भारताने केव्हा जिंकला होता, जाणून घ्या.

Hocky
India defeated by Argentina in hockey(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताच्या हॉकी संघाला अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात ३-५ असा पराभव स्वीकारावा लागला. पूल-ईमधील या सामन्यावर भारतीय संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा अवलंबून होत्या. मात्र अर्जेंटिनाकडून मिळालेल्या पराभवामुळे भारताचे अंतिम चारमध्ये पोहोचण्याचे आव्हान संपले.

३६ सेकंदांत अर्जेंटिनाचा गोल

सामन्याला सुरुवात होताच अर्जेंटिनाने भारतावर आक्रमणाची मालिका सुरू केली. अवघ्या ३६ सेकंदांत जोआक्विन टोस्कानीने गोल करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर टॉमस डोमेनेने आणखी दोन गोल करत अर्जेंटिनाची स्थिती मजबूत केली. सुरुवातीच्या या पिछाडीमुळे भारतावर मोठा दबाव निर्माण झाला.

Maharashtra TimesSaina Nehwal : देशासाठी पदकं जिंकणाऱ्या सायना नेहवालला भाजप प्रवेशानंतर खुणावतंय आणखी एक मोठं स्वप्न; पुढचं पाऊल नेमकं काय? स्वत:च सांगितलं

सुखजीत, हार्दिककडून प्रयत्न; पण सामना हातातून निसटला

भारताने सामन्यात पुनरागमनासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले.सुखजीत सिंहने दोन गोल करत संघाच्या आशा जागवल्या, तर हार्दिक सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल नोंदवला. मात्र भारताच्या प्रयत्नांवर अर्जेंटिनाच्या आक्रमणाने पाणी फेरले. निकोलस डेला टोरे आणि लुकास टोस्कानी यांनी गोल करत अर्जेंटिनाची आघाडी कायम ठेवली.

Maharashtra TimesDhruv Jurel tattoo : श्रीलंकेत मैदान गाजवल्यानंतर ‘जय जवान जय किसान’ सेलिब्रेशन, टॅटूमागची खरी कहाणी सांगताना ध्रुव काय म्हणाला?

५१ वर्षांची प्रतीक्षा कायम

१९७५ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताला पुन्हा या स्पर्धेत विजेतेपद मिळवता आलेले नाही. यंदाच्या स्पर्धेत पदक मिळवण्याची अपेक्षा होती, मात्र अर्जेंटिनाविरुद्धच्या पराभवाने तीही संपुष्टात आली. आता भारतीय संघाला स्पर्धेतील सातव्या स्थानासाठी खेळावे लागणार आहे. २८ ऑगस्ट रोजी बेल्जियमविरुद्ध भारताचा सामना होणार आहे.

Maharashtra TimesUsain Bolt Record : जगातल्या सर्वात वेगवान धावपटूला कोणी दिली मात? बोल्टचा 17 वर्षांचा विक्रम मोडला; 100 मीटरचा नवा बादशाह कोण?
पुरुष हॉकी विश्वचषक २०२६ मध्ये भारताची सुरुवात आशादायक झाली होती. पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकल्याने भारतीय संघाची उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्यानंतरच्या सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी करता न आल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले.

भारताल अशी होती संधी

भारताने अर्जेंटिनाला चार गोलच्या फरकाने नमवले तर नेदरलँड्सचा निसटता विजयही पुरेसा ठरणार होता. इंग्लंडने हार टाळल्यास भारताचे आव्हान संपणार होते. भारताला विजयासाठी आक्रमणात अचूकता आणण्याची गरज होती. तसेच गोलचा बचावातही सुधारणा गरज होती. अर्जेटिना संघात स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्यात आघाडीवर असलेला तॉमस डोमेन होता.

हॉकी वर्ल्ड कप २०२६मधील भारताचा प्रवास

  • भारत ३-१ वेल्स – भारताची स्पर्धेत विजयी सुरुवात
  • इंग्लंड ४-२ भारत – दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला
  • भारत ५-३ पाकिस्तान – पाकिस्तानवर भारताने दमदार विजय
  • नेदरलँड्स ३-१ भारत – पुढील सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव
  • अर्जेंटिना ५-३ भारत – निर्णायक सामन्यात अर्जेंटिनाकडून भारताचा पराभव
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा