Headlines

‘हर घर तिरंगा’ अभियान साजरे करा !


स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक भारतीय नागरीकाने ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रव्यापी अभियानात सहभागी व्हावे आणि प्रत्येक घरात हे अभियान साजरे केले जावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. येत्या शनिवारी भारताचा 80 वा स्वतंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त त्यांनी या अभियानाची घोषणा केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या वातावरणनिर्मितीसाठी मंगळवारी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ‘तिरंगा’ मिरवणुकांचे आयोजनही करण्यात आले. या मिरवणुकांमध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने सहभाग घेतल्याचेही दिसून आले. यावेळी स्वातंत्र्यदिनी ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताच्या आधी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाचे संपूर्ण सादरीकरण होणार आहे. हे या स्वातंत्र्यदिनाचे एक ऐतिहासिक वैशिष्ट्या राहणार आहे. यामुळे सर्व देशभक्त नागरीकांच्या उत्साहात अधिकच भर पडणार आहे. तशी वातावरणनिर्मिती होताना स्पष्ट दिसून येत आहे.

यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनापासून भारताच्या स्वातंत्र्याच्या 80 व्या वर्षाचा प्रारंभ होत आहे. या निमित्त या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. या अभियानाची ही 2026 ची आवृत्ती साजरी केली जाणार आहे. प्रत्येक भारतीय नागरीकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा आणि या अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असा संदेश प्रसारित करण्यात येत आहे. या अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्यास आतापासूनच प्रारंभ झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.

दिल्लीत ‘वंदे मातरम्’ समूहगान

स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच या स्वातंत्र्यदिनी दिल्लींच्या लाल किल्ल्यावर ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताच्या आधी ‘वंदे मातरम्’ या स्वातंत्र्यसंघर्षाच्या मंत्रगीताचे गायन होणार आहे. हे गीत संपूर्णपणे सादर पेले जाणार आहे. त्यानंतर भारताचे ‘राष्ट्रगीत’ ‘जन गण मन’ गायले जाणार आहे, अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ‘एक्स’ या माध्यमावर संदेश प्रसारित करुन दिली आहे. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीतासंबंधीच्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी स्वाक्षरी केली. अशा प्रकारे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे.

स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली होतेय सज्ज !

भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्येक वर्षीच अपूर्व उत्साहाने साजरा करण्यात येतो. भारताची राजधानी दिली हा दिवस साजरा करण्यासाठी सज्ज होत आहे. सुरक्षा व्यवस्था बळकट राखण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना करण्यात येत आहेत. लाल किल्ल्याच्या सुशोभीकरणालाही प्रारंभ करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी सलग 12 व्या वेळेला स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या प्राचीवरुन राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. त्यासाठीही सज्जता केली जात आहे.

 

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत