Headlines

सूर्यापेक्षा 100 अब्ज पटीने प्रखर! अंतराळात सापडली सौरमालेपेक्षाही गूढ वस्तू, जेम्स वेब टेलिस्कोपचा नवा धमाका । Maharashtra Times


अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप संदर्भातील एका ताज्या शोधाने खगोलशास्त्रज्ञांना थक्क केले आहे. शास्त्रज्ञांनी सुरुवातीच्या विश्वात एका अत्यंत रहस्यमय आणि मोठ्या वस्तूचा शोध लावला आहे. ही भव्य रचना आपल्या संपूर्ण सौरमालेपेक्षाही आकाराने मोठी असून, अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात यापूर्वी असे काहीही कधीही पाहिले गेले नाही. दरम्यान, ही वस्तू नेमकी काय आहे, याविषयी जाणून घेऊया.

Mysterious Alien Object । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
अंतराळात एक गूढ वस्तू सापडली आहे. अंतराळात सापडलेली ही अनोखी रचना तब्बल 100 अब्ज सूर्यांच्या एकत्रित ताकदीने आणि प्रकाशाने चमकत आहे. विज्ञानासाठी पूर्णपणे अज्ञात असलेल्या या गूढ वस्तूचा अभ्यास आता शास्त्रज्ञ करत आहेत. जेम्स वेब टेलिस्कोपच्या या ऐतिहासिक शोधामुळे विश्वाच्या निर्मितीचे आणि त्यातील अद्भूत घटकांचे अनेक नवनवीन पैलू जगासमोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (REF.)

अधिक माहिती अशी आहे की, नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांनी सुरुवातीच्या विश्वात ( Early Universe ) एका गूढ वस्तूचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे अंतराळात यापूर्वी कधीही न पाहिलेली ही वस्तू अत्यंत वेगळी आणि अनोखी आहे. हो. अंतराळातील ही अवाढव्य रचना आपल्या संपूर्ण सौरमालेपेक्षाही आकाराने मोठी असून, तब्बल 100 अब्ज सूर्यांच्या एकत्रित ताकदीने आणि प्रकाशाने ही वस्तू चमकत आहे.

ब्लॅक होल स्टार

तुम्हाला माहिती आहे का की, बिग बँग (Big Bang) म्हणजेच विश्वाच्या निर्मितीनंतर अवघ्या काही कोटी वर्षांनी अस्तित्वात आलेली खरं तर ही वस्तू इतकी विलक्षण आणि असामान्य आहे की, संशोधकांनी या विश्वातील एका पूर्णपणे नवीन श्रेणीची संकल्पना ही मांडली आहे, ज्याला “ब्लॅक होल स्टार” (कृष्णविवर तारा) असे नाव देण्यात आले आहे.

MIT मधील संशोधकांच्या टिमने शोध लावला

‘Nature’ या जगप्रसिद्ध वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध झालेला हा शोध मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधील संशोधकांच्या नेतृत्वाखालील एका टिमने हा शोध लावला आहे. विश्वातील काही सुरुवातीच्या आकाशगंगांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या एका सर्वेक्षणादरम्यान हा मोठा शोध लागला आहे.

वस्तू प्रखर, गडद लाल ठिपक्यासारखी

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या (JWST) फोटोंमध्ये ही वस्तू एका अतिशय प्रखर आणि गडद लाल ठिपक्यासारखी (Red Dot) दिसत होती.

परंतु, जेव्हा याचे अधिक बारकाईने शास्त्रज्ञांकडून निरीक्षण करण्यात आले, तेव्हा असंम्हणता येईल की एक अतिशय विचित्र गोष्ट समोर आली. ही वस्तू सामान्य ताऱ्याच्या तुलनेत प्रचंड जास्त पटीने अधिक चमकदार होती, तरीही तिची रचना अंतराळातील कोणत्याही माहिती असलेल्या कृष्णविवराशी (Black Hole) किंवा आकाशक्रियेशी (Galaxy) जुळत नव्हती.

वस्तुमान सूर्याच्या तुलनेत 1 लाख पटीने जास्त

“आम्हाला (शास्त्रज्ञांना) असे वाटते की या वस्तूच्या केंद्रस्थानी एक कृष्णविवर (Black Hole) आहे, ज्याचे वस्तुमान सूर्याच्या तुलनेत तब्बल 1 लाख इतक्या पटीने जास्त आहे,” असे MIT मधील प्रमुख लेखक रोहन नायडू यांनी सांगितले.

“या कृष्णविवराच्या सभोवताली वायूचे अत्यंत विस्तीर्ण आणि मोठे आवरण असावे, जे आपल्या सौरमालेच्या आकाराच्या एका मोठ्या ताऱ्यासारखे हे दिसते,” असंही रोहन नायडू यांनी सांगितलं.

‘MoM-BH-1*’ असे नाव देण्यात आले

याविषयी अधिक माहिती अशी की, ‘MoM-BH-1*’ असे नाव देण्यात आलेली ही वस्तू एका अतिशय घनदाट हायड्रोजन वायूच्या आवरणाने (Cocoon) वेढलेल्या मोठ्या कृष्णविवराची बनलेली असावी, असं शास्त्रज्ञांना वाटतं,.

नेहमीच्या ताऱ्यांप्रमाणे, जे अणुसंलयन (Nuclear Fusion) प्रक्रियेद्वारे स्वतःची ऊर्जा निर्माण करतात, हा मोठ्या वैश्विक राक्षस त्याच्या मध्यवर्ती कृष्णविवरात कोसळणाऱ्या आणि खेचल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे (Matter) ऊर्जा मिळवत असण्याची शक्यता आहे.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा