Headlines

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार ;रस्त्यावर घाण करणार कृत्य आढळल्यास थेट हजाराची वसुली


Nagpur News: सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत असल्याने महापालिकेने नवीन प्रस्ताव जारी केला आहे. आता रस्त्यावर थुंकत असल्यास , कचरा टाकताना आढळल्यास ५०० ते हजार रूपयांच्या पटीत दंड आकारण्यात येणार आहे.

रस्त्यावर घाण टाकल्यास होणार कारवाई
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, नागपूर : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचा दंड १०० रुपयांवरून थेट एक हजार रुपये करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. यात रस्त्यावर थुंकणे, उघड्यावर लघुशंका व शौच करणे, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, रस्ते खोदणे, पाणी चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशा ५२ नागरी उपद्रवांवर कठोर दंडाची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी घाण करणे नागरिकांना आता चांगलेच महागात पडणार आहे.

कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवरही कारवाई

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी हा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास महापालिका सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर नवीन दंडात्मक नियम लागू केले जाणार आहेत. सध्या असलेल्या ३० नागरी उपद्रवांची संख्या वाढवून ५२ करण्यात आली आहे. नागरिकांसोबतच दुकाने, हॉटेल्स, संस्था आणि मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवरही कारवाईची तरतूद आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाणार

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या लहान हॉटेल्स, दुकाने आणि संस्थांना दोन हजार रुपये, तर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांना २० हजार रुपयांचा दंड प्रस्तावित आहे. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास नागरिकांना ५०० रुपये, आस्थापनांना दोन हजार रुपये, तर बल्क वेस्ट जनरेटर आणि निवासी संघटनांना१० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास एक हजार रुपये आणि उघड्यावर शौच केल्यास दोन हजार रुपयांचा दंड प्रस्तावित आहे.

Maharashtra TimesMumbai Taxi: टीप द्या, अन्यथा राइड रद्द’ला केंद्राचा दणका;प्रवाशांकडून अप्रत्यक्षरीत्या टीप उकळण्याच्या प्रकारावर नियंत्रण

महापालिका कठोर कारवाई करणार आहे

जैववैद्यकीय कचऱ्याची नियमबाह्य विल्हेवाट लावणाऱ्यांवरही महापालिका कठोर कारवाई करणार आहे. धोकादायक वैद्यकीय कचरा कचरा संकलन वाहनात टाकल्यास १० हजार रुपयांचा दंड प्रस्तावित आहे. अशी कृती पुन्हा आढळल्यास संबंधित आस्थापना सील करण्याची तरतूद आहे. जैववैद्यकीय कचरा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांना पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यासोबत फौजदारी कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.

Maharashtra TimesNagpur News: ओसी नसलेल्या बांधकामांची होणार आता तपासणी ; महापालिका करणार सर्वेक्षण , अहवाल जाणार थेट राज्य सरकारकडे

दंड वाढविण्याचा प्रस्ताव

बांधकाम किंवा पाडकामातून निर्माण होणारा मलबा उघड्यावर ठेवल्यास दररोज दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तीन दिवसांत मलबा हटवला नाही, तर तो जप्त करण्याची तरतूद आहे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मलबा टाकल्यास पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. कचरा जाळणे, वारंवार कचरा टाकणे, अतिक्रमण करणे, अनधिकृत फेरीविक्री आणि सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा निर्माण करणे, यासाठीही दंड वाढविण्याचा प्रस्ताव आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा