PM Modi Meets Commonwealth Athletes : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समधून परतलेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. यानंतर सुवर्णपदक विजेती साक्षी चौधरीने मोदींच्या साधेपणाचे कौतुक केले. मोदींनी ‘जे खेळतात, तेच चमकतात!’ असा संदेश दिला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी बॉक्सर साक्षी चौधरी हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांच्या साधेपणाचं कौतुक केलं. ‘आम्हाला पंतप्रधानांना भेटून खूप आनंद झाला; ते अत्यंत नम्र आहेत,’ असं साक्षीने म्हटलं. रविवारी दिल्लीतील निवासस्थानी पंतप्रधान मोदींनी कॉमनवेल्थ गेम्समधून परतलेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली.
या भेटीत मोदींनी पदक विजेत्या खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांबद्दल जाणून घेतलं. खेळाडूंच्या शानदार कामगिरीचं कौतुक करत त्यांनी त्यांचा उत्साहही वाढवला. या विशेष भेटीचा व्हिडिओ मोदींनी सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यातील काही क्षण सध्या चर्चेत आहेत.
खेळाडूंनी पंतप्रधानांना काही शब्द बोलण्याची विनंती केली. त्यावेळी मोदींनी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देताना ‘जे खेळतात, तेच चमकतात!’ असा संदेश दिला. यासोबतच त्यांनी ‘Cheer4Bharat’चा नारा देत देशवासीयांनी भारतीय खेळाडूंचा नेहमी उत्साह वाढवावा, असं आवाहन केलं. त्यानंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत त्यांनी खेळाडूंचं मनोबल वाढवलं.
साक्षी चौधरीने सांगितला भेटीचा अनुभव
पंतप्रधानांसोबत झालेल्या संवादानंतर सुवर्णपदक विजेती साक्षी चौधरीने या भेटीबद्दल प्रतिक्रिया दिली. मोदींचा साधेपणा आणि खेळाडूंशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत साक्षीला भावली. त्यामुळे पंतप्रधानांना भेटल्यानंतर तिने त्यांना अत्यंत नम्र असल्याचं म्हटलं.
भारताने जिंकली ३९ पदकं
ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. भारताच्या खात्यात एकूण ३९ पदकं जमा झाली. यामध्ये १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे. या कामगिरीनंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेत पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं. खेळाडूंच्या मेहनतीचं कौतुक करताना त्यांनी देशातील क्रीडा संस्कृती आणखी मजबूत करण्याचा संदेशही दिला.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा