Headlines

सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवार आज रस्त्यावर:छत्रपती संभाजीनगरात रास्ता रोकोनंतर अन्नत्याग आंदोलन, सुप्रिया सुळेंसह विरोधी नेत्यांची उपस्थिती




शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार आज छत्रपती संभाजीनगरात मोठे आंदोलन करणार आहेत. सकाळी 10 वाजता केंब्रिज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, त्यानंतर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते सहभागी होणार आहेत. कर्जमाफीच्या जीआरवर रोहित पवारांचा आक्षेप रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या जीआरवर गंभीर आक्षेप घेतला आहे. कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या विविध अटी आणि त्रुटींमुळे लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे सरकारने कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि बैलगाड्यांसह मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी पंढरपूरमध्ये आंदोलन केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरातही रोहित पवार आक्रमक भूमिका घेणार आहेत. ’30 बस, शेकडो पोलीस तैनात; तरी संघर्ष थांबणार नाही’ आंदोलनापूर्वी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या अन्नदात्याच्या ‘स्वागता’साठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारने जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी 30 पिंजरे (बस) आणून उभे केले असून शेकडो पोलिस तैनात केले आहेत. पण तरीही अन्नदात्याच्या न्यायाचा संघर्ष थांबणार नाही. भेटू थोड्याच वेळात… केंब्रिज चौक, संभाजीनगर-जालना हायवे.” या पोस्टमुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केल्याचे स्पष्ट झाले आहे. रास्ता रोकोनंतर अन्नत्याग आंदोलन सुरुवातीला केंब्रिज चौकात रास्ता रोको करण्यात येणार असून, त्यानंतर अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे. हे आंदोलन किती काळ चालणार आणि सरकारकडून त्यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारच्या कर्जमाफी धोरणावर विरोधकांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली असून, या आंदोलनातून राज्यातील कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरसकट‎‎ कर्जमाफी‎‎शिवाय‎‎ स्वस्थ बसणार‎‎ नाही- पवार तत्पूर्वी, कर्जमाफी योजनेत ८०‎टक्के शेतकरी अपात्र ठरत आहेत. ‎‎शेतकऱ्यांना‎‎ सरसकट‎‎ कर्जमाफी‎‎ घेतल्याशिवा य‎‎स्वस्थ बसणार‎‎ नाही, असा इशारा‎ आमदार रोहित पवार यांनी‎ पत्रपरिषदेत दिला होती. २९ जून रोजी ‎छत्रपती संभाजीनगर येथे सर्वपक्षीय ‎एल्गार अन्नदात्याचा आंदोलन ‎करण्यात येणार असल्याचे त्यांनी‎ सांगितले. सरकारने कर्जमाफी ‎देताना दोन जाचक अटी घातल्या ‎आहेत, अशी टीका त्यांनी केली. नीट पेपरफुटीवरून पवार आक्रमक 2024 मध्ये सुद्धा नीटचा पेपरफुटला होता पण तरीही त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याला भाजपशासित राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून बढती देण्यात आली. त्यामुळे त्या विभागातील लोकांचे धाडस वाढले आणि 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटला, असे रोहित पवार यांनी म्हटले. तर ज्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायला पाहिजे होते त्यांना बढती मिळाल्याने त्यांचे धाडस वाढले, म्हणून पुन्हा 2026 मध्ये पेपर फुटला. नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत केली पाहिजे. रोहित पवार म्हणाले की, अमोल मिटकरी यांना आमदारकी मिळाली पाहिजे होती ही सर्वांची भावना होती, पण त्यांना संधी देण्यात आली नाही. मिळाले कोणाला तर कोकणातील नेत्याच्या मुलाला आणि भाईजींच्या दिवानजींना संधी मिळाली आहे. अजित पवार नाराज असलेल्या नेत्यांनाच आज ताकद दिली जात असेल तर मग संदेश असा जातो की पक्षाच्या अध्यक्षांचे काही चालत नाही इतर नेत्यांचे चालते. आता संघर्षांचा काळ आहे यात खरी भूमिका घेण्याची गरज आहे. लोकांसाठी लढणे गरजेचे आहे, पण काही लोकांना सत्ता जास्त गरजेची आहे असा टोला अजित पवार गटातील नेत्यांना नाव न घेता लगावला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत