Headlines

सरपंच आरक्षण सोडतीत विजयदुर्ग सरपंच खुल्या प्रवर्गासाठी जाहीर


देवगड/ वार्ताहर : देवगड तालुक्यातील आगामी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षित जागांमधून एक जागा खुल्या प्रवर्गात वाढविण्यासाठी या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये विजयदुर्ग ग्रामपंचायत सरपंच आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता येथील तहसीलदार कार्यालयात सरपंच आरक्षण सोडत देवगड तहसीलदार सौ. शीतल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार विवेक शेठ, श्री. खरात, वरिष्ठ लिपिक श्री. कोयंडे आदी अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या विविध अधिसूचना तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सन २०२५ ते २०३० या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या सुधारित आदेशानुसार जिल्ह्यातील सरपंच आरक्षणात काही बदल करण्यात आले असून त्यानुसार देवगड तालुक्यातही सुधारित आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यात आली.
देवगड तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायती असून त्यामधील सरपंचपदांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग अशा विविध गटांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या नव्या सूचनेनुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण आरक्षित १० जागा असून त्यामधील एक जागा सोडत पद्धतीने कमी करून खुल्या प्रवर्गात एक जागा वाढविण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. देवगड तालुक्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील १० ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण जागांमधून आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. विद्यार्थी कु. वरद संदीप मेस्त्री याच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये विजयदुर्ग ग्रामपंचायतीची चिठ्ठी उचलली. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी विजयदुर्ग ग्रामपंचायत सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले. आता बुरंबावडे, उंडील, तोरसोळे, मुणगे, गवाणे, दाभोळे, कातवण, कट्टा, शिरगाव या नऊ ग्रामपंचायतीचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असेल. आता नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सर्वसाधारण 9 जागा व महिला प्रवर्गासाठी 10 जागा अशा एकूण 19 जागा आरक्षित राहिल्या. तर खुल्या प्रवर्गात सर्वसाधारण 24 व महिला प्रवर्गासाठी 24 जागा आरक्षित झाल्या आहेत. या आरक्षण सोडत कार्यक्रमात शिवसेना शिंदे पक्षाचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर, शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, शिरगांव सरपंच समीर शिरगांवकर, तोरसाळे सरपंच सौ. तेजस्विनी पवार, सुधीर जाधव, दीपक नाईक, अशोक जाधव आदी उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत