Headlines

सगुण-निर्गुण: वासुदेव नामे फोडितो टाहो – constant remembrance of vasudeva teaching of saints for kalyug


-डॉ. सुनील शिंदे

संत साहित्यातला तसेच लोकसाहित्यातला वासुदेव मनाचा ठाव घेणारा. भाविकांना दिशा देणारा. सामान्यांना अंतर्मुख करणारा. गावखेड्यातील लोकपरंपरेत थेट काळजात पोचणारा. जाग आणणारा अन् टाहो फोडणारा. ‘दान पावलं…’ म्हणता म्हणता मनाची विशालता – तळमळ लख्ख लख्ख करणारा. सावळ्या रूपाला ‘मानसी नित्य राहो’ असा साद घालणारा हा वासुदेव पहाटपण साजिवंत करून शतकानुशतके काळवेळ पावन करत आलाय.

साध्या सोप्या, सरळ भाषेत जनमानस जागविले. विचार दिला. आचार दिला. तत्त्वज्ञान सांगितले. शहाणपण दिले. अवघ्या चिंता त्यागून संतपदी ध्यान असो ही वासुदेवाची आस आणि भावना. संत सज्जन – भाविकांच्या सहवासात चित्त असावे ही सोज्वळ भावना. भक्तियोग अक्षय टिकावा. अद्वैताची चाल हवी. द्वैतसंग तो टळो. निजरूपाचे – आत्मतत्त्वाचे दर्शन व्हावे, ही वासुदेवाच्या उपदेशाची उदात्त धारणा. सत् कथेचा श्रवणीय आनंद लाभावा. सदैव जीभेने नामसंकीर्तन, नाममंत्र वदावे. हेच ते दान पावणे आहे.

नामाचा टाहो आणि भगवंताचे चरण हेच दान अपेक्षित असणारा संत एकनाथ महाराजांचा वासुदेव, दोष भंग पावतील ही भविष्यवाणी कशी कथितो पहा –

मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो।

देखिले पाय आता मागतो दान द्या हो।

एका जनार्दनी दोष जाती भंगा।।

नित्य वासुदेव स्मरण ही संतांची कलियुगातील शिकवण. विषयवासना, व्यर्थ संसार श्रम यांत अडकू, गुंतू नये ही वासुदेवाची हात जोडून कळकळीची विनवणी. तीन प्रहर टळूनही निजणाऱ्या जीवाला खडसावणारा तुकयाबंधू संत कान्होबा महाराजांचा वासुदेव देखील जागे होऊन दानाचा उपदेश करताना दिसतो.

पानफूल, फळ यथायोग्य ते अर्पावे असे आवाहन करणारा वासुदेव विन्मुख होऊ नये असेही आवर्जून बजावतो. दान-मान, त्याग, अर्पण समर्पण भाव हा खराखुरा वासुदेवाचा उपदेश. जागरुकता, सत्यवचन आणि सेवावृत्तीची सूचकता ही वासुदेवाची वाणी. क्रोध, संताप, लुबाडणूक, अभिलाषा या दुर्गुणांना वासुदेवाच्या वाणीत मुळीच थारा नाही!

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत