Headlines

शुक्रवारी सावंतवाडीत पोस्ट खात्याचे विशेष शिबिर


सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी पोस्ट खात्यामार्फत अपघात विमा तसेच आधार कार्डमधील मोबाईल क्रमांक बदलणे, नावामध्ये झालेली चूक दुरुस्त करणे आदी कामांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सावंतवाडी शहरातील उभा बाजार, सुवर्णा पेठ येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये नागरिकांना आधार कार्डमधील आवश्यक दुरुस्ती व अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पोस्ट खात्यामार्फत विविध प्रकारचे अपघाती विमे नागरिकांना काढून देण्यात येणार आहेत.

या शिबिरासाठी सावंतवाडी पोस्टमास्तर प्रकाश गावडे आणि सहाय्यक पोस्टमास्तर जयराम बावलेकर यांचे सहकार्य लाभले आहे.

शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी येथील जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२४३५७६० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत