Headlines

शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्यांचे कौतुक कशाला?:प्रधानांच्या पाठीशी उभे राहणे हीच अंधभक्ती, फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर पवारांचा संताप




नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या कामाचे कौतुक करत संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे ट्विट केले होते. फडणवीसांच्या याच ट्विटचा समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. रोहित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस साहेब, शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचे कौतुक आपण करत असाल आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचे सांगत असाल, तर याला काय म्हणावे? त्यांनी राजीनामा त्यांच्या चुकीमुळे दिला नाही तर उपकार केला आहे, हेच आपल्याला सुचवायचे आहे का?” असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवारांचे ट्विट काय? रोहित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस साहेब, शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक आपण करत असाल, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचं आपण सांगत असाल तर याला काय म्हणावं? राजीनामा त्यांच्या चुकीमुळे दिलेला नाही तर त्यांनी उपकार केला आहे, हे आपल्याला सुचवायचंय का? गेले महिनाभर महिलांसह हजारो युवकांना लाठ्या काठ्या खाल्ल्या, 20-24 दिवसांचं उपोषण करावं लागलं, काहींनी pellet gun चा सामना केला तर कुणी छर्रेच्या गोळ्या खाल्ल्या… आजही अनेक जण दवाखान्यात उपचार घेत आहेत, या सगळ्याबाबत आपल्याला कधी सहानुभूती वाटली नाही, पण आज धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल सहानुभूती वाटत आहे. किती अंधभक्ती करणार? असा सवाल रोहित पवार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीस यांना केला आहे. फडणवीस यांचे ट्विट काय? देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलंय की, देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचे काम धर्मेंद्र प्रधान जी यांनी केले. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ लागू करण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. पीएम श्री शाळा, आयआयटीचा परदेशात विस्तार, तसेच प्रवेश परीक्षांचा 19 भाषांमध्ये विस्तार यांसारख्या अनेक सुधारणा त्यांनी केल्या. व्यापक समाजहिताप्रति आपली बांधिलकी दाखवत त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहिताला अधिक महत्त्व दिले, हीच भाजपच्या खऱ्या कार्यकर्त्याची ओळख आहे. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत