Headlines

व्हायरल तापाने मुंबई फणफणली; गॅस्ट्रो, डेंग्यूच्या रुग्णांत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ, ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको! – mumbai illness guide typhoid leptospirosis viral fever dengue malaria patient rise


Mumbai Viral Fever: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये या आजारांचा त्रास अधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

viral fever
व्हायरल तापाने मुंबई फणफणली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर ओसरल्यानंतर विविध संसर्गजन्य आणि जलजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयांमध्ये व्हायरल ताप, गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया आणि इन्फ्लूएंझासदृश आजारांच्या रुग्णांमध्ये सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे डॉक्टरांनी निरीक्षण नोंदवले आहे.

पावसाळ्यानंतर जलजन्य आणि संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दरवर्षी दिसून येते. यंदाही ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू आणि टायफॉइडच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. काही रुग्णांमध्ये तापासोबत खोकला, थकवा, हातपाय दुखणे आणि पोटदुखी अशी मिश्र लक्षणे आढळत आहेत.

Maharashtra TimesUddhav Thackeray: प्रधानांचा राजीनामा घेण्यात कमीपणा का? उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारला प्रश्न
फिजिशियन डॉ. एन. एम. मोरे यांनी सांगितले की, गेल्या दोन आठवड्यांत व्हायरल संसर्गाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः २२ ते ५५ वयोगटातील रुग्णांमध्ये हा संसर्ग अधिक आढळून येत आहे. वैयक्तिक स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे, सर्दी-खोकल्याची लक्षणे असल्यास गर्दी टाळणे, नियमित अंतराने पुरेसे पाणी पिणे आणि ताजे, गरम अन्न सेवन करणे, असा सल्लाही त्यांनी दिला.

या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
– ताप दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणे
– श्वास घेण्यास त्रास होणे
– घशात खवखव आणि सतत खोकला
– तीव्र अंगदुखी व अशक्तपणा
– तीव्र पोटदुखी, जुलाब किंवा उलट्या दम्याचा त्रास वाढणे
– रक्तदाब किंवा मधुमेह नियंत्रणाबाहेर जाणे
डेंग्यूची लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे

Maharashtra TimesAshwini Bhide: अश्विनी भिडेंचा आदेश, पण ७ दिवसांनंतरही कारवाई नाही; मॅनहोल दुर्घटनेतील कंत्राटदाराची बेपर्वाई, नेमकं काय घडलं?
मुलांमध्येही व्हायरल संसर्गाचे प्रमाण वाढले
व्हायरल ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव लहान मुलांमध्येही वाढल्याने बालरुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी नियमित लसीकरण पूर्ण करणे, स्वच्छ पाणी पिणे आणि दूषित अन्न टाळणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा