Vaibhav Sooryavanshi News : भारत आणि आयर्लंडमधील पहिला टी-२० सामना सुरू व्हायला काही तास बाकी आहेत. या सामन्याआधी बॅटिंग कोचने वैभव सूर्यवंशी याच्या खेळण्याबाबत संभ्रम वाढवला आहे. गंभीर आणि श्रेयसचं नाव घेत काय म्हणाले जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी याची सर्वत्र चर्चा असून आज आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये त्याला संधी दिली जाईल अशी आशा सर्वांनाच आहे. १५ वर्षांच्या वैभवसाठी मोठी संधी असणार आहे, मात्र एक अडचण झाली आहे ती म्हणजे वैभवला ओपनिंगला उतरतो मग संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यातील कोणाला बसवणार? अशातच या मुद्द्यावर भारतीय संघाचे बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आणखी संभ्रम वाढला आहे.
वैभव सूर्यवंशीला खेळवणार की नाही?
वैभव हा प्रतिभावान युवा खेळाडू असून त्याच्या गुणवत्तेबाबत अजिबात शंका नाही. आयपीएलमध्ये त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली ते पाहून त्याच्यातील क्षमता सर्वांना समजली. जोफ्रा आर्चरसारख्या गोलंदाजाचा कोणताही दबाव न घेतला नाही. कारण तो एक असाधारण आणि प्रतिभावान खेळाडू आहे. पण या आधारावर लगेच त्याला पदार्पण करण्याची संधी मिळेल याची शाश्वती नाही. वैभवला संधी देण्यासाठी दुसऱ्या कोणाला बसवलं जाणार नाही, पण शेवटी अंतिम निर्णय हा हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन श्रेयस अय्यर यांच्या हातात अंतिम निर्णय असल्याचं सितांशू कोटक म्हणाले. IND W vs BAN W : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघ जिंकूनही ‘हरला’, नेमकं काय चुकतंय? रविवारी शेवटची संधी वैभवला जर संधी मिळाली किंवा नाही मिळाली चांगली गोष्ट आहे कारण तो भारतीय संघाचा भाग असणं हीच मोठी गोष्ट आहे. त्याला नक्की संधी मिळेल. टीम मॅनेजमेंटची कोणत्याही खेळाडूवर अन्याय करण्याची इच्छा नाहीये. युवा खेळाडूने कोणताही दबाव न घेता आपल्या खेळाचा आनंद घेतला पाहिजे, असंही कोटक यांनी सांगितलं. IND vs IRE : वैभव आज धिंगाणा घालणार? आयर्लंडविरूद्धच्या मॅचची वेळ बदलली, कुठे पाहता येणार? जाणून घ्या दरम्यान, वैभव सूर्यवंशी याने आयपीएलनंतर श्रीलंकेमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतही आपली छाप उमटवली होती. वन डे फॉरमॅटमध्ये असलेल्या वनडे मालिकेमध्ये त्याने सुरूवातीलाच आक्रमण चढवले. चांगली सुरूवातही करून दिली पण त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयश येत होतं. यावरून त्याच्यावर टीका होऊ लागली होती, पण फायनल सामन्यात ३०० च्या स्ट्राइक रेटने ९४ धावांची खेळी करत त्याने सर्वांची तोंडं बंद केली होतीत. आज जर त्याला संधी मिळाली की तो कसे प्रदर्शन करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा