Headlines

विमानतिकिटाच्या दरांची गगनाला गवसणी ;सणासुदीच्या काळातील हवाई प्रवास खिशाला कात्री लावणारा


म.टा.विशेष प्रतिनिधी,मुंबई:राखीपौर्णिमा, जन्माष्टमी आणि सलग ‘ लाँग वीकेंड ’च्या पार्श्वभूमीवर मुंबईसह नवी मुंबई विमानतळांवरून लोकप्रिय मार्गांवरील विमान तिकिटांचे दर झपाट्याने वाढले आहेत. दोन दिवसांत घरी किंवा नातेवाइकांकडे जाऊन नोकरीच्या ठिकाणी परतणारे नोकरदार आणि धार्मिक पर्यटनस्थळांकडे वळणारे पर्यटक या पार्श्वभूमीवर विमानतिकिटांच्या दरांनीही उड्डाण घेतले आहे. तर, आयत्या वेळच्या बुकिंगसाठी प्रवाशांना दुप्पट ते तिप्पट दर मोजावे लागत आहेत.

धार्मिक पर्यटनस्थळांकडे ओढा

सणाच्या निमित्ताने घरच्यांसोबत सण साजरा करण्याबरोबरच धार्मिक पर्यटनस्थळीहीभेट दिली जाते. त्यामुळे मुंबई ते अयोध्या दिल्लीमार्गे परतीचा प्रवास हा किमान २३ हजारांपर्यंत पोहोचलेला दिसत आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने जगन्नाथ पुरीलाही पर्यटक जातात. हे दरही १८ ते २० हजारांपर्यंत पोहोचल्याचे पर्यटन व्यावसायिक सांगत आहेत.

गोवा, उदयपूरही महागले

सणांच्या निमित्ताने शहराच्या गजबजाटापासून दूर जाण्यासाठी गोवा, उदयपूर अशा शहरांना या काळात पसंती मिळते आहे. त्यामुळे या मार्गांवरील दरही वाढले आहेत.

दरवाढीचा फटका कुठे ?

मुंबई-अहमदाबाद मार्गावर २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान जाण्यायेण्याचे तिकीट २६ हजारांपर्यंत पोहोचलेले दिसत आहे. गुरुवारी कार्यालयाचे काम आटोपल्यानंतर थेट विमानप्रवास करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी तसेच, सोमवारी थेट कार्यालयात पोहोचू इच्छिणाऱ्यांसाठी या प्रवासाचा खिशाला मोठा फटका बसू शकतो. याच मार्गाचे आयत्या वेळी बुकिंग केल्यास त्याचे दर दुपटीने वाढले आहेत, अशी माहिती तिकीट बुकिंग एजंटने दिली.

Maharashtra TimesNagpur News: ३० दिवसांत १ हजार कोटींचे वसुलीलक्ष्य ;उत्कृष्ट कामगिरी तर होणार गौरव,कामात हलगर्जीपणा तर होणार कारवाई, कर्मचाऱ्यांना दिला अलर्ट

वाढलेले तिकीट दर

मुंबई-अहमदाबाद : २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान ये-जा तिकीट सुमारे २६ हजार रुपयांपर्यंत

राखीपौर्णिमेसाठी आधी बुकिंग केलेल्यांचा हाच प्रवास १० ते ११ हजारांत

गोकुळाष्टमीसाठी वृंदावनाचे वेध

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने वृंदावनला जाणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम विमानांच्या तिकिटांवर झाला आहे.

.मुंबई-आग्रा : २ ते ४ सप्टेंबरदरम्यान दर ४० हजार रुपयांपर्यंत

.दहीहंडीच्या दिवशी मुंबई-आग्रा : एका वेळचे तिकीट २५ ते ३० हजारांपर्यंत

.मुंबई-दिल्ली : जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या दिवशी तिकीट ६ ते ७ हजारांपर्यंत

.मुंबई-अयोध्या, दिल्लीमार्गे परतीचा प्रवास : किमान २३ हजार रुपये

Maharashtra TimesSanket Nevshe : मूर्तीचा तोल जाताच संकेतने दोन हातांनी पेलण्याचा प्रयत्न केला, शेवटचा व्हिडिओ पाहताच नेवशे कुटुंब भावूक, भावाने सांगितलं अखेरच्या क्षणी काय घडलं
.मुंबई-जगन्नाथ पुरी : १८ ते २० हजार रुपये

.मुंबई-आग्रा / वृंदावन परिसर २५ ते ४० हजार रुपये

.मुंबई-गोवा : नेहमीचे दर अडीच ते तीन हजार; सध्या सहा ते सात हजार

.मुंबई-उदयपूर : ये-जा प्रवासाचा खर्च किमान २० हजारांपर्यंत

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत