भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या कथित गुप्त भेटीच्या चर्चा सुरु असतानाच विनोद तावडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे़ यांची भेट घेतली. मुंबईत झालेली ही भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरलीये. लोकसभा निवडणुकीच्या काळापासूनच एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील संभाव्य ‘घरवापसी’ची चर्चा सुरू होती. मात्र, तावडे यांनी थेट खडसेंच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली ही भेट केवळ कौटुंबिक नसून त्यामागे दिल्लीचे मोठे राजकीय गणित दडलेले आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या भेटीमुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे आकारास येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. तावडे- खडसे भेटीचं नेमकं कारण काय? या भेटीनं कोणत्या राजकीय चर्चा सुरु झाल्या तेच या व्हिडिओतून समजून घेऊया..