Headlines

वाघिणींनो अभिनंदन! टी-20 वर्ल्ड कपचं स्वप्न तुटलं पण महिला संघासाठी ऑलिम्पिकआधी आनंदाची बातमी


Womens Team in Olympics : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया खंडातील अव्वल संघ म्हणून २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे, अशी घोषणा सोमवारी आयसीसीने केली. मात्र पुरुष संघाला थेट प्रवेशासाठी २०२६ च्या अखेरीस आयसीसी टी-२० आशियाई क्रमवारीत पहिल्या स्थानावर राहावे लागेल.

Womens Team India
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला. आशिया खंडातील अव्वल संघ म्हणून भारतीय महिला संघाने ही पात्रता मिळवल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलतर्फे (आयसीसी) सांगण्यात आले. भारतीय पुरुष क्रिकेट संघाला मात्र २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी या वर्षाअखेरीस (२०२६) आयसीसी टी-२० संघांच्या आशियाई क्रमवारीत अव्वल स्थानी रहावे लागेल. आयसीसीने या पात्रता निकषांची घोषणा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.

ऑलिम्पिकची पात्रता निश्चित केलेला हा भारताचा पहिलाच संघ आहे. भारतीय संघ सध्या जागतिक पर्यायाने आशियाई क्रमवारीत अव्वल आहे. आशियाई देशांची क्रमवारी लक्षात घेतल्यास भारतापाठोपाठ पाकिस्तान (६), बांगलादेश (८), श्रीलंका (९), अफगाणिस्तान (१०) हे संघ आहेत. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप टी-२० मध्ये उपांत्य प्रवेश करणाऱ्या महिला संघांना स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आला आहे.
Maharashtra TimesSuryakumar Yadav : आयर्लंडकडून भारत हरला, सूर्याने जखमेवर मीठ चोळलं? पोस्टनं टायमिंग साधलंच अन् तुफान प्रतिसादही मिळाला
विविध खंडांतील चार पुरुष संघांचे प्रवेश हे क्रमवारीद्वारे निश्चित होतील. ‘ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनचा सहभाग असतो, त्यामुळे कोटा फक्त ब्रिटनमधील एका देशाला म्हणजे इंग्लंडला दिला जाईल’, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.

  • महिलांच्या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनचा सहभाग निश्चित
  • लॉस एंजेलिसमध्ये रंगणाऱ्या ऑलिम्पिकच्या टी-२० स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी सहा देश सहभागी होणार
  • आयसीसी वर्ल्ड कप महिला टी-२० स्पर्धेद्वारे ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी पात्रता मिळवली

विंडीजचे समीकरण काय ?

कॅरेबियन देशांचे प्रतिनिधित्व करणारा आयसीसीचा सदस्य म्हणून वेस्ट इंडीजला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची (आयओसी) मान्यता नाही, कारण त्यांची स्वतःची राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नाही. विंडीज क्रमवारीनुसार ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळणार असेल, तर आयसीसीकडून खास कॅरेबियन पात्रता स्पर्धेचे आयोजन होईल.
Maharashtra TimesWPL मध्ये हवा, मग देशासाठी खेळताना फेल का? वर्ल्डकपमधील ५ मोठ्या चुका सांगत अंजुम चोप्रांनी कोणावर फोडलं खापर?

यजमान अमेरिकेला पाचवे स्थान; पण…

यजमान संघ म्हणून अमेरिकेच्या पुरुष आणि महिला संघांना प्रत्येक गटात एक कोटा मिळेल. मात्र त्यांच्या दोन्ही संघांना क्रमवारीत अव्वल पंधरामधील स्थान राखावे लागेल.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा