Vasai Water Project: वसईकरांची पाण्याची चिंता लवकरच मिटणार आहे. महापालिका ‘खोलसापाडा-१’ आणि ‘खोलसापाडा-२’ हे महत्त्वाचे प्रकल्प राबवत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, वसई: वसई-विरार शहरातील झपाट्याने वाढणारे नागरीकरण लोकसंख्या आणि लक्षात घेऊन भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खोलसापाडा धरणातून वसई, विरार शहरापर्यंत ६८ एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) क्षमतेची नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महापालिकेने जाहीर सूचना प्रसिद्ध करत निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
महापालिकेतर्फे ‘खोलसापाडा-१’ आणि ‘खोलसापाडा-२’ हे दोन महत्त्वाचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. यापैकी खोलसापाडा-२ धरणाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून ते लवकरच सेवेत येण्याची शक्यता आहे. तर खोलसापाडा-१ धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दोन्ही प्रकल्पांतून शहराला अतिरिक्त ६८ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी धरणातून शहरापर्यंत नवीन पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प ‘नागरी आव्हान निधी’ कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येत आहे. शासनाच्या सहकार्याने आर्थिक गुंतवणूक आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेने पात्र गुंतवणूकदार, वित्तीय संस्था,बँका, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रातील नामांकित कंपन्यांकडून ‘स्वारस्य अभिरुची’ मागविली आहे.
वांद्री, देहर्जे आणि सुसरी प्रकल्प मंजुरीसाठी सरकारकडे
शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना महापालिकेने इतर मोठ्या प्रकल्पांनाही गती दिली आहे. देहर्जे प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यातून भविष्यात १९० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच सुसरी धरणातून २०० एमएलडी पाणी मिळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय वाढते नागरीकरण आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन वांद्री मध्यम प्रकल्पातूनही पाणी आरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली असून तो शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा