Headlines

वन्यजीव व वारसा दस्तऐवजीकरणातील उल्लेखनीय कार्याची दखल


दोडामार्ग प्रतिनिधी : वन्यजीव छायाचित्रण, ऐतिहासिक व वारसा स्थळांचे दस्तऐवजीकरण तसेच निसर्गाच्या अनमोल ठेव्याच्या कथा जतन करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारे मधुवन फॉरेस्ट्सचे छायाचित्रकार व इतिहास अभ्यासक विकास कुलकर्णी यांचा विशेष सन्मान होणार आहे. ‘महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड्स अँड कॉन्क्लेव्ह २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात विकास कुलकर्णी यांना ‘वन्यजीव आणि वारसा दस्तऐवजीकरण उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.( Insights Success) यांच्या वतीने आणि (Insights Excellence Awards ) यांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जात आहे.

वन्यजीव छायाचित्रणाच्या माध्यमातून निसर्ग आणि वन्यजीवांचे विविध पैलू टिपण्यासोबतच ऐतिहासिक व वारसा स्थळांचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विकास कुलकर्णी यांनी केले आहे. नैसर्गिक परिसर, वन्यजीव आणि स्थानिक वारशाशी निगडित कथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने छायाचित्रण व दस्तऐवजीकरणाच्या माध्यमातून केलेल्या त्यांच्या कार्यामुळे विकास कुलकर्णी यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

‘महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड्स अँड कॉन्क्लेव्ह २०२६’ या सोहळ्याला अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे. विकास कुलकर्णी यांना मिळणारा हा सन्मान कोकणातील वन्यजीव, निसर्ग आणि वारसा संवर्धनाच्या कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण दाद मानली जात आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत