Headlines

रेल्वे प्रकल्पांना अतिक्रमणांचा ‘थांबा’; कल्याण-बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गिका रखडली| Maharashtra Times


Airoli-Kalwa Railway Project: मध्य रेल्वेवरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवे रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. कल्याण ते बदलापूर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचं काम आणि ऐरोली-कळवा उन्नत मार्गाचं काम अतिक्रमणांमुळे रखडलं आहे.

मुंबई लोकल प्रकल्प
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महामुंबईतील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी नवे रेल्वे मार्ग मंजूर झाले आहेत. मात्र अतिक्रमणांमुळे कागदावरील रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात येताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या ( एमआरव्हीसी ) कल्याण-बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका आणि ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गिका प्रकल्प यांमध्ये एकूण १,५७४ अतिक्रमणे आढळून आली आहेत. यामुळे १७,०६८ चौरस मीटर जागा अद्याप अतिक्रमणाखाली असल्याने अशा जागी प्रकल्पाची वीटही रचली जात नसल्याचे चित्र आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराचा वापर करून हे वास्तव समोर आणले आहे. कल्याण ते बदलापूरदरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर ७०६ अतिक्रमणे आढळली. यात झोपड्या आणि अन्य बांधकामांचा समावेश आहे. यापैकी ६२० अतिक्रमणे हटवण्यात आली आहे. मात्र अद्याप ८६ अतिक्रमणांनी ९,६६८ चौरस मीटर जागेवर कब्जा केला आहे. ही अतिक्रमणे कल्याण ते बदलापूरदरम्यान विविध ठिकाणी पसरलेली आहेत.

Maharashtra TimesKandivali Railway Terminus: मुंबईतील सर्वात मोठं रेल्वे टर्मिनस उभारण्याची तयारी, कांदिवलीमध्ये जमीन निश्चित; प्रकल्पासमोर एक अडथळा

ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा अतिक्रमणांमुळे रखडला आहे. प्रकल्पाच्या जमिनीवर ८६८ अतिक्रमणे असून त्यापैकी ३७८ अतिक्रमणांवर हातोडा मारून हटवण्यात आली आहे. दिघा गाव ते कळवा रेल्वे स्थानकादरम्यानची ७,४०० मीटर जागा अद्यापही रेल्वेच्या ताब्यात आलेली नाही.

संयुक्त यंत्रणेची गरज

‘अतिक्रमण हटवलेल्या जागांवर पुन्हा बेकायदा बांधकाम होऊ नये, यासाठी एमआरव्हीसी, रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी संयुक्तपणे व्यवस्था उभारावी. रेल्वे प्रकल्पांतील जमीन संपादन, अतिक्रमण, पुनर्वसन आणि अतिक्रमण हटविण्याची अद्ययावत माहिती नियमित वेबसाइटवर द्यावी’, अशी मागणी गलगली यांनी केली.

अतिक्रमणांचा तपशील माहीत नाही !

अतिक्रमणे नेमकी किती वर्षांपासून आहेत, या प्रश्नावर एमआरव्हीसीने स्पष्ट उत्तर देणे टाळले. प्रत्येक अतिक्रमणाचा कालावधी वेगवेगळा असल्याने एक वर्ष सांगणे शक्य नाही, असे उत्तर देण्यात आले आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा किती अतिक्रमणे झाली, याची नोंद उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

Maharashtra TimesMumbai Local : CSMT फास्ट लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये डाऊन मारण्यावरुन वाद, महिलेने सहप्रवाशांवर पेपर स्प्रे फवारल्याने गोंधळ

हायड्रोजन ट्रेन ‘मेक इन इंडिया’च्या यशाचे उदाहरण

जिंद ते सोनिपतदरम्यान धावणारी हायड्रोजनवरील रेल्वे हे ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे एक यशस्वी उदाहरण आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधान मोदी यांनी देशातील हायड्रोजनवरील पहिल्या रेल्वेला हरियाणातील जिंद येथे शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला.

या ऐतिहासिक घटनेमुळे हायड्रोजनवरील रेल्वे कार्यरत असलेल्या जगातील मोजक्या देशांच्या यादीत भारत दाखल झाला आहे. या प्रसंगी पंतप्रधानांनी १४,७०० कोटी रुपयांच्या विकासप्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणीही केली. ‘ही जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे आहे. पश्चिम आशियातील युद्ध आणि तेल संकटामुळे होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग प्रभावित झाला असूनही भारताची रेल्वे आणि विकास थांबलेला नाही. २०१४पूर्वी अशी परिस्थिती असती, तर रेल्वे ठप्प झाली असती’, असे मोदी म्हणाले.

गेल्या अनेक वर्षांपासून तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेची मागणी होत आहे. पण अनेक कारणांमुळे हे काम रखडलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. रेल्वे प्रशासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा