Sonam wangchuk hunger strike abhijeet dipke father bhagwanrao dipke attack on pm narendra modi; नरेंद्र मोदींना मूलबाळ नाही, त्यामुळे त्यांना जनतेचं देणंघेणं नाही; दिपकेच्या वडिलांची घणाघाती टीका, उपोषणाबद्दल मोठी घोषणा
Sonam wangchuk hunger strike abhijeet dipke father bhagwanrao dipke attack on pm narendra modi; नरेंद्र मोदींना मूलबाळ नाही, त्यामुळे त्यांना जनतेचं देणंघेणं नाही; दिपकेच्या वडिलांची घणाघाती टीका, उपोषणाबद्दल मोठी घोषणा
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: “लोकशाहीमध्ये ही भारतीय लोकांची चूक आहे की त्यांनी अशा व्यक्तीला निवडून दिलंय की ज्याला संसाराचा कुठलाही व्याप नाही, मूल नाही, कुटुंबात कोणत्या गोष्टी लागतात, याचं या व्यक्तीला काहीही देणंघेणं नाही. जो मोकाट सुटलेला सांड आहे, अशा माणसाला जनतेनं पंतप्रधानपदी बसवलं आहे. त्याचे परिणाम आता सगळा देश भोगत आहे,” असं म्हणत कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके याचे वडील भगवानराव दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने उपोषणस्थळाहून हटवल्यानंतर भगवानराव दिपके यांनी ही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
भगवानराव दिपके पुढे म्हणाले की, “मनुष्य प्राणी सर्वश्रेष्ठ आहे. गाढव, डुक्कर, कुत्रे या प्राण्यांपैकी एक, नरेंद्र मोदी या प्राण्याला परमेश्वराने सुबुद्धी द्यावी की या मुलांचे ऐकावे आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा. आता माझी सर्व भीती मरून गेली आहे, मी कोणाच्या बापाला भरणार नाही. लोकशाही धोक्यात आली आहे आणि ही गुलामगिरीकडे चाललेली सुरुवात आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्या,” असे आवाहन दिपके यांनी केले. रविवारपासून ते स्वतः देखील मुलासोबत उपोषणाला बसणार आहेत.
“माझा मुलगा परदेशात मस्त सेटल झाला होता. त्याला कर्ज काढून शिकवले होते. पण, नीट पेपर लीक प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या पाहून तो भावनेच्या भरात भारतात आला. मी त्याला खूप विनंती केली होती की, इकडे येऊ नको, इथले सरकार आणि वातावरण चांगले नाही. पण, त्याने ऐकले नाही. आता तो उपोषणाला बसला आहे, त्याची आई-वडील म्हणून आम्हाला काळजी वाटणारच ना?” अशा शब्दांत अभिजीत दिपकेचे वडील भगवानराव दिपके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर, त्याची आई अनिता दिपके यांनी, “सरकार निर्दयी झाले आहे. लहान मुलाने बिस्किटचा पुडा मागितला तरी आई-वडील देतात, पण हे सरकार मुलांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करत आहे,” असा संतप्त आरोप केला.
“वांगचुक सरांसारखे अभिजीतला उचलले तर आम्ही काय करणार?”
अभिजीत दिपके याच्या आई अनिता दिपके यांनी सोनम वांगचुक यांच्या अटकेचा हवाला देत सरकारवर टीका केली. “सकाळी वांगचुक सरांना जसे पडदा टाकून गपचूप उचलून नेले, तसेच जर अभिजीतबाबत झाले तर आम्ही काय करणार? सरकारला कशाचा अहंकार आहे? त्यांनी दुसरा मंत्री दिला असता, तरी मुलांना वाटले असते की आपले ऐकले. माझा मुलगा महिनाभरापासून परेशान आहे, न खाता-पिता तिथे आहे. ज्यांना मुले-बाळे नाहीत, त्यांना लेकरांची किंमत नसते. आम्ही रविवारपासून त्याच्यासोबत उपोषणाला बसणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.
“मी कर्ज काढून शिकवले, तो हट्टापोटी भारतात आला”
अभिजीतचे वडील भगवानराव दिपके यांनी मुलाच्या निर्णयावर आणि देशातील परिस्थितीवर भाष्य केले. “तो काही मुरलेला राजकारणी नाही, तो केवळ शिक्षण पूर्ण करून आलेला नागरिक आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्याने ‘कॉक्रोच पार्टी’ काढली, जिला लाखो लोकांनी पाठिंबा दिला. मी त्याला इकडे येऊ नको असे सांगितले होते, कारण जी. डी. अगरवाल यांच्यासारख्या गंगा शुद्धीकरणासाठी लढणाऱ्या मोठ्या माणसांची काळजी कोणी घेतली नाही. आता त्याची भीती वाटतेय. भारतीय लोकांनी अशा व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवले आहे की ज्याला कुटुंबाचे काही देणेघेणे नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा