आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाची दखल थेट लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे देखील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले आहेत. पुण्यात राहुल गांधींसमोर निर्भीडपणे आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचा प्रश्न मांडणाऱ्या तरुणीचे रोहित पवारांनी कौतुक केले. राहुल गांधींकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास यावेळी रोहित पवारांनी व्यक्त केला.