Omega Block: युरोपमध्ये सर्वांत तीव्र उष्णतेची लाट आली असून अक्षरशः रस्ते आणि रुळ वितळू लागले आहेत. गेल्या १० दिवसांमध्ये १३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वृत्तसंस्था, लंडन: युरोप आत्तापर्यंतच्या सर्वांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. तीव्र उन्हामुळे रस्ते, ट्रामचे रुळ वितळत आहेत, तसेच हजारो लोकांना उकाड्याचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक युरोपीय देशांमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे.
१,३०० हून अधिक मृत्यू
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, २१ जूनपासून युरोपमधील उच्च तापमानाशी संबंधित १,३००हून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. अनेक लहान मुलांचा बंद गाड्यांमध्ये मृत्यू झाला, तर उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी जलाशयाच्या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या काही तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पॅरिसमध्ये उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याने शवागृहे आणि स्मशानभूमींवर प्रचंड ताण आला आहे. फ्रान्समध्ये १८ जूनपासून किमान ७४ जणांचा बुडून मृत्यू झाला. आता येथे तापमान कमी होत आहे, मात्र जुलैमध्ये आणखी एक उष्णतेची लाट येण्याची शक्यता राष्ट्रीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या आठवड्यात सर्वप्रथम पश्चिम युरोपला प्रचंड उष्णतेचा विळखा बसला. हा उष्मा अलीकडच्या काही दिवसांत पूर्वेकडे सरकला. पोलंड, चेक रिपब्लिक आणि जर्मनीमध्ये उच्चांकी तापमान नोंदवले गेले. जर्मनीमध्ये तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या वर गेले, तर चेक रिपब्लिकमध्ये ते ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडून गेले. स्वित्झर्लंडमधील बासेलमध्ये तापमान ३८. ८ अंश सेल्सिअस या विक्रमी पातळीच्या वर गेले. त्याच वेळी डेन्मार्कने १८७४पासूनचा सर्वांत उष्ण दिवस अनुभवला. यूकेमध्येही जून महिन्यातील आत्तापर्यंतचा सर्वांत उष्ण दिवस नोंदवला गेला.
‘ओमेगा ब्लॉक’मुळे तापमान वाढलं?
हवामान शास्त्रज्ञांच्या मते ओमेगा ब्लॉकमुळे तयार झालेल्या ‘हीट डोम’मुळे उष्णता वाढली आहे. युरोप खंडावर एक उच्च दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे. यामुळे हवा खाली ढकलली जात आहे आणि ढगांची निर्मिती मंदावते. त्यामुळे सूर्य प्रकाश जमिनीवर अधिक काळ राहतो आणि तापमान अचानक वाढू लागतं. या घटनेला ओमेगा ब्लॉक असं म्हणतात. ओमेगा ब्लॉकचं नाव ग्रीक अक्षक Ω (ओमेगा) वरून पडलं आहे. कारण यावेळी हवेचा आकार या अक्षरासारखा होतो. दोन कमी दाबांच्या क्षेत्रामध्ये उच्च दाबाचं क्षेत्र अडकलेलं असतं. या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे जमिनीवरील गरम हवा वरती जाऊ शकत नाही आणि तिथेच अडकून राहते. त्यामुळे परिसरातील तापमान वाढू लागतं.
Heatwave in Europian countries : रस्त्यावरचं डांबर वितळलं, रेल्वे रुळ वाकले, युरोपात भयंकर उकाडा
या ब्लॉकमुळे उष्णता तीव्र होते, दिवसाचं तापमान वाढू लागतं, रात्रीही उष्मा वाढतो. त्यात पावसाच्या अनुपस्थितीमुळे माती कोरडी होते. फ्रांसमधील एका हवामान संस्थेच्या मते पोर्तुगालच्या बाहेर एक थंड आघाडी एखाद्या गरम पंपासारखी काम करत आहे. उत्तर आफ्रिकेतून येणारी उबदार हवा येथे खेचली जाल आहे. यामुळे फ्रान्स आणि स्पेनवर बसलेल्या ओमेगा ब्लॉकमध्ये गरम हवा वाढत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा