Headlines

मोटारसायकली चोरणाऱ्या जोडगोळीला अटक


महाराष्ट्र-कर्नाटकातून चोरली अडीच लाखांची पाच वाहने

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

महाराष्ट्र-कर्नाटकात मोटारसायकली चोरणाऱ्या एका जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून 2 लाख 60 हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अंकलगी पोलिसांनी ही कारवाई केली असून या जोडगोळीने अंकलगी, चिकोडी, चंदगड, कोल्हापुरातही वाहने चोरल्याची कबुली दिली आहे.

भरमाप्पा यल्लाप्पा कोप्पद (वय 25) राहणार तेळगीनहट्टी, ता. गोकाक, रोहित कल्लाप्पा कदम (वय 24) राहणार हुदली, ता. बेळगाव अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून यामाहा आरएक्स-135, यामाहा आरएक्स-100, होंडा शाईन, हिरो स्प्लेंडर प्लस अशा एकूण पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

संशयास्पदरित्या फिरताना भरमाप्पा व रोहित यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची चौकशी केली. हे दोघे फिरत असलेल्या वाहनाची कागदपत्रे विचारण्यात आली. मात्र, ते कागदपत्रे हजर करू शकले नाहीत. शेवटी चोरीची वाहने असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना अटक करून पाच वाहने जप्त केली आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत