Headlines

मोज्तबांबाबत जनतेमध्ये शंका:इराणमध्ये नवे सत्ताकेंद्र; खाेमेनी यांचा नातू अली यांना इस्लामी फ्रंटचा पाठिंबा




इराणमध्ये नवे पॉवर सेंटर उदयास येत आहे. इस्लामी क्रांतीचे जनक अयातुल्ला खोमेनी यांचा नातू अली खोमेनी यांना इस्लामी फ्रंटचा पाठिंबा मिळाला आहे. नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी जिवंत असल्याच्या शंकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जात आहे. पुढे काय… इराण आखाती देशांत दबदबा वाढवणार अली गल्फ प्लानवर पुढे जातील. याअंतर्गत आखाती देशांना अमेरिकन क्लबमधून बाहेर काढून इराणच्या गोटात आणायचे आहे. इराणमध्ये आता सुधारणावाद्यांसाठी आपला अजेंडा पुढे नेणे अधिक कठीण होईल. हिजबुल्लाह, हमास आणि हुतींना इराण अधिक लष्करी मदत देईल. ट्रम्प म्हणाले… होर्मुझमध्ये जहाजांकडून २०% टोल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की आम्ही होर्मुझ चालवू. येथे जहाजांकडून २०% टोल वसूल करू. सुरक्षाही पुरवू.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत