Headlines

मेघालयात दगडफेकीनंतर 12 हजार पर्यटक अडकले:भीतीने बुकिंगही रद्द, केएसयूच्या रॅलीमुळे शिलाँगमध्ये तणाव; अनेक रस्ते पडले ओस


  • Marathi News
  • National
  • 12 Thousand Tourists Stranded After Stone Pelting In Meghalaya, Bookings Cancelled Due To Fear, Tension In Shillong Due To KSU Rally; Many Roads Deserted

मनोज कुमार लस्कर | गुवाहाटी/शिलाँग8 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

डोंगराळ आणि धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी मेघालयला पोहोचलेले हजारो पर्यटक बुधवारी संध्याकाळी अचानक दगडफेक सुरू झाल्यावर हादरले. यामुळे क्षणात संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. भीतीपोटी गुरुवारी शिलाँगचे रस्ते ओस पडले होते. सुमारे १२ हजार पर्यटक हॉटेल आणि होम-स्टेमध्येच अडकून पडले.

मेघालयची खासी स्टुडंट युनियनने (केएसयू) काढलेल्या बाइक रॅलीवेळी शिलाँगमध्ये अचानक गोंधळ सुरू झाला. उपद्रवी बाजारात तोडफोड करू लागले. रस्त्याने जाणाऱ्या पर्यटकांना मारहाण करू लागले. आसाम पासिंगच्या पर्यटक गाड्यांवर दगडफेक करू लागले. शिलाँगच्या रस्त्यांवर रात्रीपर्यंत हेच भीतिदायक दृश्य होते. ईस्ट खासी हिल्सचे एसपी विवेक सिएम यांनी सांगितले की, उपद्रवींनी ३१ गाड्यांची तोडफोड केली. एक वाहन जाळण्यात आले. शिलाँगच्या फोर स्टार हॉटेल पोलो टॉवर्सच्या एका व्यवस्थापकालाने दिव्य मराठी नेटवर्कला सांगितले की, बाहेर तणावाचे वातावरण आहे. अतिरिक्त सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. या वातावरणातील धक्कादायक बाब म्हणजे कदाचित पहिल्यांदाच पर्यटकांवर हल्ला झाला आहे. त्यामुळे या तणावाचा परिणाम आता बुकिंगवर होत आहे.

पुढील आठवड्यातील अनेक बुकिंग रद्द झाल्या आहेत. सोहरा येथील एका गेस्ट हाऊसचे व्यवस्थापक जॉन लाकुपार यांनी सांगितले की, येथे ३०० हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि होम-स्टे आहेत. बहुतेकांची पुढील तीन दिवसांची बुकिंग रद्द झाली आहे. टूर ऑपरेटर उदीप्त पाठक यांनी सांगितले की, बुकिंग रद्द करणाऱ्यांमध्ये बहुतांश पर्यटक गुजरात आणि बंगालमधील आहेत.

खरं तर, पर्यटक गुवाहाटीमार्गे टॅक्सीने शिलाँगला पोहोचतात. बहुतेक गाड्या आसाम पासिंगच्या असतात, त्यामुळे पर्यटकांत भीती आहे. शिलाँगला फिरायला आलेल्या एका कुटुंबाने आपली आपबीती सांगताना सांगितले की, अचानक झालेल्या दगडफेकीत त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. मुलाला दुखापत झाली. ज्यांना शहर सोडायचे आहे, त्यांना पोलिस सुरक्षेत आसाम सीमेपर्यंत पोहोचवले जात आहे.

टॅक्सी व्यवसायाला मोठा फटका

मेघालयात सध्या मान्सूनचा हंगाम ऐन भरात आहे. दररोज ३ हजारांहून अधिक पर्यटक येत आहेत. राज्यातील ३०% लोकसंख्या केवळ पर्यटनावर अवलंबून आहे. बहुतेक पर्यटक ६ हजार रुपयांपर्यंत भाड्याने टॅक्सी घेऊन येतात. अशा वेळी ताज्या वादामुळे दैनिक टॅक्सी, बसेसचे नेटवर्क जवळजवळ ठप्प आहे.

केएसयूने ४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा यांना निवेदन दिले होते. यात राज्यात मेघालय रेसिडेंट्स सेफ्टी ॲक्ट लागू करणे, इनर लाइन परमिट कडक करणे आणि सरकारी भरती प्रक्रियेत सुधारणा करणे या प्रमुख मागण्या होत्या. यासाठी त्यांनी १५ दिवसांची मुदत दिली होती, ती बुधवारी संपली. त्यानंतर केएसयूने रॅली काढली. काही लोकांनी पर्यटकांना मारहाण केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत