![]()
नुकतीच एक घटना घडली. अभिनेत्री तृषा हीतमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या स्वातंत्र्यदिनसोहळ्यात दिसली. त्यानंतर मोठे वादळ उठले. तृषा तिथेएका प्रमुख जागी बसली होती. विजय यांच्या कुटुंबाशीसंवाद साधत होती. मग काय, राजकीय टोलेबाजी,सोशल मीडियावर तर्कवितर्क व साहजिकच त्यांच्यानात्याबद्दलच्या चर्चांचा पूर येणे अटळ होते. पण या सगळ्यात सर्वात आधी एकच प्रश्न विचारलापाहिजे : दरवेळी अशा कुठल्याही कथेत स्त्रीच आरोपीका ठरते? ‘दुसरी स्त्री’ ही आपल्या समाजातील सर्वातजुनी आणि कायम राहिलेली एक खलनायिका आहे. तीपुरुषाला भुलवते, घर मोडते, प्रचंड महत्त्वाकांक्षी आहेआणि अधिकार नाही तिथे ती घुसखोरी करते; याचनजरेने तिच्याकडे पाहिले जाते. तिने काय परिधान केलेआहे, ती कुठे बसली आहे, तिने कोणाला नमस्कार केलाआणि ती किती आपुलकीने हसली—या प्रत्येक गोष्टीचेबारकाईने परीक्षण केले जाते. तर दुसरीकडे या कथेच्याकेंद्रस्थानी असलेला पुरुष मात्र अगदी ‘निष्क्रिय”दाखवला जातो; जणू काही त्याच्या सभोवतालच्या गोष्टीआपोआपच घडत आहेत! हा कोणाच्या वैयक्तिकआयुष्याचा बचाव नाही. विजय आणि तृषा यांच्या खाजगीआयुष्यातील सत्य शोधणे हे आपले काम नाही. पणसार्वजनिक चर्चा किती सहजतेने सर्व नैतिक जबाबदारीस्त्रीवर ढकलतात आणि पुरुषाच्या भूमिकेकडे पूर्णपणेदुर्लक्ष करतात, यावर हे भाष्य नक्कीच आहे. एखाद्याशक्तिशाली पदावर असलेला पुरुष एखाद्या स्त्रीलाआमंत्रित करतो, तिला सोहळ्यात सहभागी करून घेतो.तिच्याशी मैत्री करतो किंवा संवाद ठेवतो, तर तो त्याचास्वतःचा निर्णय असतो. त्यांच्यात कोणतेही नाते असेल,तर या कथानकात पुरुष काही असहाय पात्राच्या भूमिकेतनाही. तो एक सज्ञान व्यक्ती आहे. पण पुरुषसत्ताकव्यवस्था स्त्रियांनाच एकमेकांविरुद्ध उभे करणे सोपे मानतआली आहे. कदाचित म्हणूनच आजची महत्त्वाकांक्षीस्त्री आपल्याला अस्वस्थ करते. आकर्षक स्त्री आपल्यामनात संशय निर्माण करते. आपल्याला आजही स्त्रिया यामर्यादेत राहणाऱ्या, लाजाळू, नैतिकतेची खात्री देणाऱ्यास्वरूपातच आवडतात. पण त्या सुंदर, यशस्वी, सत्तेच्याजवळ असतील तर आपण त्यांना दोषी ठरवण्यासाठीपुरावे शोधू लागतो. आपण पुरुषांच्या निर्णयांवर प्रखरतेनेप्रश्न का विचारत नाही? प्रभावशाली पुरुषांना त्यांच्यावैयक्तिक किंवा व्यावसायिक नात्यांमध्ये निष्पाप किंवा ‘पॅसिव्ह ’ दाखवणे हा केवळ लैंगिक भेदभाव नाही, तरअत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. अनेक शतकांपासून स्त्रियापुरुषांच्या निर्णयांचे परिणाम भोगत आल्या आहेत.पत्नीकडून संसार टिकवण्याची अपेक्षा केली जाते,आईकडून कुटुंब एकत्र ठेवण्याची, मुलीकडून घराची‘प्रतिष्ठा’ जपण्याची आणि ‘दुसऱ्या स्त्रीकडून’ सर्वदोषांचे खापर स्वतःच्या डोक्यावर घेण्याची अपेक्षा केलीजाते. बहुधा आता ही पारंपरिक पटकथा बदलण्याची वेळआली आहे. या प्रकरणात स्त्रीवादी दृष्टिकोनाचा प्रश्नअत्यंत सरळ आणि सोपा आहे : पुरुषांच्या निर्णयांचीनैतिक जबाबदार स्त्रीला मानणे आपण कधी थांबवणार?आपण हे थांबवणार नाही, तोपर्यंत प्रत्येक तथाकथित‘दुसऱ्या स्त्रीला’ जनमताच्या न्यायालयात आरोपीच्यापिंजऱ्यात उभे केले जाईल—आणि पुरुष मात्र अत्यंतआरामात दोषांच्या चौकटीबाहेर निसटून जाईल! (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
Source link
मेघना पंत यांचा कॉलम:पुरुषांच्या निर्णयांचे खापर आपण किती काळ स्त्रियांवरच फोडणार?
